‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. या शोमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न पाहते. मात्र, काही मोजक्याच स्पर्धकांचे हे स्वप्न पूर्ण होते. नुकताच शोचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यात अमिताभ एका स्पर्धकाला एक कोटी रुपयांचा प्रश्न विचारतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोत अमिताभ सविता नावाच्या एका महिला स्पर्धकासोबत मस्ती करताना दिसत आहेत. सविता एक नर्स आहेत. “तुम्ही लोकांना इंजेक्शन देतात आणि स्वत: जेव्हा इंजेक्शन घेण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही पळून जातात”, असे अमिताभ बोलतात. यावर सविता बोलतात, “सर, इंजेक्शन देताना भीती वाटत नाही पण घेताना वाटते.” पुढे अमिताभ एक कोटी रुपयांसाठी १५ प्रश्न विचारतात.

आणखी वाचा : समांथाच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये चाहत्यांना मिळाली आनंदाची बातमी

आणखी वाचा : सैफने सांगितले होते अमृताशी घटस्फोट आणि करीनासोबत लग्न करण्याचे खरं कारण

‘केबीसी १३’मध्ये, आता पर्यंत मध्ये प्रदेशचे गणित विषयाचे शिक्षक प्रांशु त्रिपाठी यांनी ५० लाख रुपये जिंकले. तर आग्राच्या शिक्षिका हिमानी बुंदेल या एकमेव अशा स्पर्धक आहेत, ज्यांनी १५ व्या प्रश्नाचे अचुक उत्तर देत १ कोटी रुपये जिंकले. आता सविता १ कोटी रुपये जिंकतील का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaun banega crorepati 13 contestant savita to play for 1 crore rupees question dcp