कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. शोमध्ये अमिताभ स्पर्धकांशी खूप गप्पा मारत खेळ पूर्ण करताना दिसतात. हा शो नेहमीच स्पर्धकांनी सांगितलेल्या त्यांच्या संघर्षाच्या गोष्टींमुळे आणि अमिताभ यांनी सांगितलेल्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. मात्र, ‘कौन बनेगा करोडपती’चा एक एपिसोड एका तक्रारारीमुळे चर्चेत आला आहे.
‘कौन बनेग कपोडपती १३’मध्ये स्टुडंट स्पेशल वीक असा एक पूर्ण आठवड्याचा शो होता. यावेळी एक मुलगी स्पर्धक म्हणून आली होती. हा एपिसोड (mid brain activation) वर आधारीत होता. यात अमिताभ यांच्या समोर असलेली मुलगी दावा करते की डोळ्यांवर पट्टी लावते आणि पुस्तकांचा वास घेऊन ते वाचून घेते. निर्मात्यांनी या एपिसोडचा प्रोमो देखील प्रदर्शित केला होता.
या एपिसोडमध्ये त्या मुलीच्या आई-वडिलांनी दावा केला होता की त्यांनी मुलीला ‘मिड ब्रेन अॅक्टिवेशन’ची ट्रेनिंग दिली आहे. परंतू या एपिसोडवर मोठा वाद निर्माण झाला आहे. Federation of Indian Rationalist Associations चे अध्यक्ष नरेंद्र नायक यांनी यावर आक्षेप घेतला आणि त्यांच्या तक्रारीनंतर आता हा प्रोमो आणि एपिसोडमधून ‘मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन’चा भाग काढून टाकण्यात आला आहे.
आणखी वाचा : आपण एवढे श्रीमंत का आहोत? अक्षयच्या मुलाने विचारला होता प्रश्न, ट्विंकल म्हणाली…
नरेंद्र यांनी चॅनलला एक पत्र लिहिले ज्यात ते म्हणाले होते की, कशा प्रकारे ‘मिड ब्रेन ऐक्टिवेशन’चा वापर करत पालकांची फसवणूक कशी केली जाते ते सांगितले आहे. पत्रात ते म्हणाले की, टीव्हीवर अशा गोष्टींची जाहिरात केल्याने आपल्या देशाचे हसू होऊ शकते. त्यांनी कलम 51A(h) चा संदर्भ दिला, ज्यात असे म्हटले आहे की वैज्ञानिक विचार, भावना आणि मानवतावाद विकसित करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
आणखी वाचा : मलायकाच्या ‘या’ सवयीची अरबाजला येत होती चीड
नरेंद्र पुढे म्हणाले की, “अनेक संस्था मिड ब्रेनची ही प्रक्रिया वापरू मुलांच्या मेंदूची शक्ती वाढते असं सांगत पालकांची फसवणूक करतात. ‘सुपर पॉवर’ म्हणजे सामान्यज्ञानाची चेष्टा आहे. नरेंद्र यांच पत्र मिळाल्यानंतर चॅनलने एपिसोडमधला तो भाग काढून टाकला आहे”, अशी माहिती चॅनलने नरेंद्र यांना मेल करत दिली आहे. यात लिहिलं होतं की एपिसोडला सगळ्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आलं आहे.