छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या शोच्या १४ व्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोला बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे विशेष महत्व प्राप्त झालं आहे. या शोमध्ये आलेल्या प्रत्येक स्पर्धकासोबत बिग बी मोठ्या विनम्रतेने आणि दिलखुलास अंदाजात संवाद साधत असतात. त्यासोबत बिग बी हे या कार्यक्रमात विविध रंगीबेरंगी कपडे परिधान करताना दिसतात. यामुळे ते कायमच चर्चेत असतात.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ते चित्रपटांसह सोशल मीडियावरही कायमच चर्चेत असतात. त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे ते सर्वत्र प्रसिद्ध आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात ते विविध रंगाचे कोर्ट, टाय, ब्रोच तर कधी स्कार्फ यासारख्या विविध अवतारात दिसतात. त्यांच्या या स्टाईलची चर्चा सर्वत्र असते. पण अमिताभ यांच्या या कपड्यांसाठी केबीसीची टीम लाखो रुपये खर्च करते.

‘कौन बनेगा करोडपती’चे प्रश्न कोण तयार करतात? उत्तरं आलं समोर

‘कौन बनेगा करोडपती’च्या प्रत्येक भागाचे सूत्रसंचालन करणाऱ्या बिग बींच्या कपड्यांसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, या शो च्या प्रत्येक भागातील कपड्यांसाठी १० लाख रुपये खर्च होतात. या प्रत्येक भागात अमिताभ बच्चन हे टाय, ब्रोच, पिन, स्कार्फसह सूट-बूटसह परफेक्ट लूकमध्ये दिसत असतात.

KBC : १ कोटी रुपये जिंकलेल्या स्पर्धकाच्या खात्यात किती रक्कम जमा होते माहितीये का?

मिळालेल्या माहितीनुसार, बिग बी वापरणारे सर्व साहित्य हे परदेशातून आयात केले जाते. गेल्या १३ व्या पर्वात प्रसिद्ध स्टायलिस्ट प्रिया पाटील यांनी अमिताभ बच्चन यांचे कपडे डिझाईन केले होते. यंदाच्या पर्वासाठी त्यांचे स्टायलिस्ट कोण स्टायलिस्ट असणार? याबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही.

दरम्यान केबीसीचे १४ वे पर्व लवकरच सुरु होणार आहे. येत्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून हा कार्यक्रम प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो सध्या व्हायरल झाले आहेत. मात्र अद्याप हा कार्यक्रम कधी सुरु होणार याची नेमकी तारीख समोर आलेली नाही.

Story img Loader