छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय आणि चर्चित शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ या शोमुळे प्रेक्षकांचे फक्त मनोरंजन होत नसून त्यांच्या ज्ञानातही भर पडत आहे. या शो चे सूत्रसंचालन दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन करत आहेत. ते नेहमीच स्पर्धकांशी संवाद साधत त्यांचे कौतुक करताना दिसतात. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये एका स्पर्धकामुळे बिग बी यांनी निर्मात्यांना शो थांबवण्याची विनंती करताना दिसले आहेत.

सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टग्राम अकाऊंटवर नवीन प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडीओत अमिताभ यांनी हॉट सीटवर विराजमान झालेली स्पर्धक नम्रता खूप सुंदर दिसत असून तिने घातलेला नेकलेस खूप छान असल्याचं सांगितलं. पुढे नम्रता अमिताभ यांना ‘अमित जी’ बोलू शकते का असा प्रश्न विचारताना दिसली. हा प्रश्न ऐकताच बिग बी तिला फक्त ‘अमित’ म्हण असे सांगताना दिसले आणि निर्मात्यांना विनंती करत म्हणाले, “कृपया हा शो थांबव मला आणि नम्रता सोबत एक कप चहा प्यायला जायचे आहे”.

अजून एका प्रोमोत नम्रता ‘कलंक’ सिनेमातील ‘घर मोरे परदेसिया’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसली. तसंच ती अमिताभ यांचे कौतुक करत ‘तुम्ही अजून सुद्धा खूप तरुण आहेत’, अशी स्तुती करताना दिसली आहे. ‘कौन बनेगा करोडपती १३.’ चा हा प्रोमो पाहून प्रेक्षक आता या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader