‘कौन बनेगा करोडपती’ आणि ‘दस का दम’ या प्रसिद्ध क्विझ शोचा निर्माता सिद्धार्थ बासू ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. अनुराग कश्यपचा हा चित्रपट ५०च्या दशकातील काळावर आधारित असून, यात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जॉन अब्राहम आणि नर्गिस फाखरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या शूजित सिरकरच्या ‘मद्रास कॅफे’ चित्रपटाद्वारे सिद्धार्थ बासू अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. या चित्रपटात करण जोहर देखील एका नकारात्मक भूमिकेत दिसेल.
कौन बनेगा करोडपतीचा निर्माता सिद्धार्थ बासू ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये
'कौन बनेगा करोडपती' आणि 'दस का दम' या प्रसिद्ध क्विझ शोचा निर्माता सिद्धार्थ बासू 'बॉम्बे वेल्वेट' चित्रपटात काम करताना दिसणार आहे.
First published on: 06-08-2013 at 11:32 IST
TOPICSअनुराग कश्यपAnurag KashyapबॉलिवूडBollywoodहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaun banega crorepati producer siddhartha basu in bombay velvet