दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदे चर्चेत आला आहे. लवकरच श्रेयस बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. श्रेयसच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एक बायोपिक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रेयसने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या चित्रपटाचं नावं ‘कौन प्रवीण तांबे’ आहे. हे पोस्टर शेअर करत ‘कौन है प्रवीण तांबे? क्रिकेटमधील सर्वांत अनुभवी पदार्पण आणि सर्वांत प्रेरणादायी क्रिकेट स्टोरी, अस कॅप्शन श्रेयसने दिले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : “पहिल्यांदा किस करताना मला…”, गिरिजा ओकने सांगितला कॉलेजमधला ‘तो’ विचित्र अनुभव

आणखी वाचा : “जात…जात नाही तोवर…”, केदार शिंदे यांनी ‘झुंड’ चित्रपटावरुन केलेले ट्वीट चर्चेत

या चित्रपटात क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. वय हा केवळ आकडा आहे, ही म्हण प्रवीण तांबे यांना लागू होते, अस म्हणायला हरकत नाही. वयाच्या ४१ व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून IPL मध्ये पदार्पण करणाऱ्या तांबेंनी हे दाखवून दिलं की, वयानुसार स्वप्नांची व्याख्या करता येत नाही.

आणखी वाचा : तैमूरने वडील सैफ अली खानवर उचलला हात, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अमीर बाप की…”

दरम्यान, हा चित्रपट १ एप्रिल रोजी डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. श्रेयसने या आधी २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इक्बाल’ या चित्रपटात त्याच्या अभिनयाने छाप सोडली आहे. जवळपास १७ वर्षांनंतर तो पुन्हा एकदा क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात श्रेयससोबत आशिष विद्यार्थी, परम्ब्रता चॅटर्जी आणि अंजली पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. जयप्रद देसाई यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaun pravin tambe biopic on ott shreyas talpade to star in a biopic dcp