मागच्या काही काळापासून क्रिकेटपटूंच्या आयुष्यावर बायोपिकच्या निर्मितीचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये सुरू झालेला पाहायला मिळत आहे. महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर, कपिल देव, मिताली राज, झुलन गोस्वामी यांच्यानंतर आता मराठी क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या आयुष्यावर आधारित ‘कौन प्रवीण तांबे’ हा बायोपिक येत्या १ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मराठी भाषेत चित्रपट प्रदर्शित न होण्याबाबत खंत व्यक्त केली आहे.

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेची मुख्य भूमिका असलेला ‘कौन प्रवीण तांबे’ हा चित्रपट उद्या म्हणजेच १ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र तमिळ तेलुगू या प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होत असताना मराठी भाषेत प्रदर्शित होण्याची कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध नाही. अभिनेता मराठी, ज्या क्रिकेटपटूच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे तो क्रिकेटपटू मराठी. असं असताना चित्रपट मात्र मराठी भाषेत प्रदर्शित होत नसल्यानं नेटकऱ्यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.

tharla tar mag arjun will married to sayali reveals chaitanya
अर्जुनचं लग्न सायलीशीच होणार! ‘ठरलं तर मग’ अभिनेत्याने सांगितला मालिकेतील पुढचा ट्विस्ट, काय आहे योजना?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
3g a killer connection kissing scenes
तब्बल ३० किसिंग सीन, बोल्ड दृश्यांचा भडीमार असलेला फ्लॉप बॉलीवूड चित्रपट, कमावलेले फक्त…
tharla tar mag wedding sequence who will arjun marry sayali or priya
‘ठरलं तर मग’ मालिकेत लगीनघाई! सायली अन् प्रिया दोघींच्या हातावर सजणार मेहंदी…; अर्जुनचं लग्न कोणाशी होणार?
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?
Chhaava Movie Controversy Political Reactions Udayanraje Bhosale sambhajiraje Chhatrapati
ऐतिहासिक चित्रपट, वादग्रस्त दृष्य व राजकीय वाद,’छावा’च्या बाबतीत नेमकं काय घडतंय?
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…

आणखी वाचा- खरंच की काय! स्वप्नील जोशीला आजही आई बाबांकडून मिळतो पॉकेटमनी? अभिनेत्यानं सांगितला किस्सा

ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेटकऱ्यांनी या चित्रपटाबाबत कमेंट केल्या आहेत. एका युजरनं यावर कमेंट करताना लिहिलं, ‘हा चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित व्हायला हवा होता.’ दुसऱ्या एका युजरनं, ‘मराठी भाषेत प्रदर्शित झाला तर नक्की पाहू.’ अशाप्रकारे नेटकऱ्यांनी हा चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित न होण्याबाबत खंत व्यक्त केली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये फक्त प्रवीण तांबे याच्या क्रिकेट खेळण्याबद्दल नव्हे तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितलं आहे. जवळपास २ मिनिटे ५१ सेकंदाच्या या ट्रेलरच्या सुरुवातील श्रेयस तळपदे गोलंदाजी करताना दिसत आहे. या चित्रपटात प्रवीण तांबे यांचा संघर्षही दाखवला गेलाय. त्यांचे वैयक्तिक आयुष्य, नोकरी, टोमणे, लग्न आणि नंतर बायकोसोबत होणारी भांडणं या सर्व गोष्टी या चित्रपटातून उलगडणार आहेत.

आणखी वाचा- सलमान- सोमीच्या ब्रेकअपचं काय होतं नेमकं कारण? तब्बल २३ वर्षांनंतर अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

कोण आहेत प्रवीण तांबे?

प्रवीण तांबे यांचा जन्म ८ जून १९७१ रोजी झाला. वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांनी आयपीएलमध्ये पदार्पण केले. गुजरात लायन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात ते सहभागी होते. प्रवीण तांबे हे ४१ वर्षांचे असताना त्यांनी राजस्थान रॉयल्समधून क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

‘कौन प्रवीण तांबे?’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जयप्रदा देसाई यांनी केले आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदेशिवाय आशिष विद्यार्थी, परमब्रत चॅटर्जी आणि अंजली पाटील हे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या १ एप्रिलला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader