‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे’, ‘कवी जातो तेंव्हा…’ या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद
नव्या पिढीमध्ये वाचन केले जात नाही, अशी तक्रार लेखक, प्रकाशक आणि कित्येकदा पालकही करत असतात. अशा वेळी मराठीतील अभिजात साहित्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अभिवाचन कार्यक्रम हा उत्तम पर्याय आहे. त्या माध्यमातून ज्येष्ठ लेखक, कवींनी निर्मिलेल्या साहित्यकृती रसिकांपर्यंत पोहोचविणे शक्य होते. साहित्य अभिवाचनाच्या माध्यमातून अभिजात साहित्य रसिक वाचकांशी सुसंवादी असावे या उद्देशातून अनेक जण धडपडीने काम करत आहेत. त्यापैकी ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे’ आणि ‘कवी जातो तेंव्हा…’ या अभिरुचीसंपन्न साहित्य अभिवाचनाच्या कार्यक्रमांनी सुवर्णमहोत्सवी प्रयोगाची मजल गाठली आहे. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सायंकाळी सात वाजता ‘कवी जातो तेंव्हा…’चा तर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे शनिवारी (१७ ऑगस्ट) ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे’चा सुवर्णमहोत्सवी प्रयोग होत आहे. रंगकर्मी अमित वझे यांनी या दोन्ही कार्यक्रमांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. डॉ. समीर कुलकर्णी हे या दोन्ही कार्यक्रमांचे मूळ लेखक असून त्यांनीच रंगावृत्ती केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा