‘FIR’ या शोमधून चंद्रमुखी चौटालाच्या भूमिकेतून अभिनेत्री कविता कौशिकचा बिनधास्त अंदाच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. खऱ्या आयुष्यातही कविता अशीच बिनधास्त आहे. कविता अनेकदा सोशल मीडियावर परखडपणे मत मांडत असते. बिग बॉसच्या १४व्या पर्वातही कविताचा हा बेधडक अंदाज पाहायला मिळाला. तर सोशल मीडियावर कविताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो. कविता बिनधास्तपणे सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
सोशल मीडियावर कविताच्या बोल्ड फोटोंना नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळताना दिसते. कविताने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पांढऱ्या रंगाच्या टू पीस बिकिनीतील फोटो शेअर केला आहे. समुद्र किनाऱ्यावरील या फोटोत ती खूपच सुंदर दिसतेय. हा फोटो शेअर करत ती कॅप्शनमध्ये म्हणालीय, “जास्त काळ नाही लोटला. जेव्हा बाहेर एकेकाळी सुखाचा काळ होता.” असं ती म्हणालीय.
View this post on Instagram
कविताच्या या फोटोला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलीय. कविताच्या पोस्ट खाली राखी सावंतने कमेंट केलीय. “हॉटेस्ट आहे माझी स्वीटहार्ट” असं राखी कमेंटमध्ये म्हणाली आहे. सोबतच राखीने काही फायरचे इमोजी कमेंटमध्ये शेअर केले आहेत.तर एका युजरने हटके कमेंट करत कविताच्या फोटोला पसंती दर्शवली आहे. ” कुणी FIR करा हिच्यावर” अशी कमेंट या युजरने केलीय.
वाचा: अरुणाचल प्रदेशच्या आमदाराला ‘चायनीज’ म्हणणाऱ्या यूट्यूबरला सेलिब्रिटींनी सुनावलं!
कविता कौशिक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बऱ्याचदा परखड मत मांडल्यामुळे कविताला ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. मात्र कविता ट्रोलर्सना अनेकदा उत्तर देत त्यांची बोलती बंद करते.