अभिनेत्री कविता कौशिकने ‘FIR’ या शोमधून चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारली आहे. या मधील तिच्या बिनधास्त अंदाजामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. खऱ्या आयुष्यातही कविता अशीच बिनधास्त आहे आणि अनेकदा ती, तिचे मत परखडपणे मांडताना दिसते. कविताच्या घरी पण गणेश उत्सव दणक्यात साजरा केला जातो मात्र काही वर्ष झाली कविता हा उत्सव साजरा करत नव्हती.
२०१६ पासून कविता गणेश उत्सव साजरा करत नव्हती. कविताने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. गणपती साजरा करतानाचे काही फोटो पोस्ट करत तिने तब्बल पाच वर्षांनी तिच्या नवीन घरी गणपती आणला असल्याचे सांगितले आहे. तिने गणपतीसोबतचे काही फोटो शेअर करत कॅप्शन दिलं, “२०१६ मध्ये वडिलांच्या निधनानंतर मी बाप्पाला घरी आणणे बंद केले, कदाचित माझं महादेवाशी भांडण सुरू होते. तुम्ही माझ्या वडीलांना घेऊन गेलात त्यामुळे मी तुमच्या मुलावर प्रेम करणार नाही. माझ्यातली काहीतरी साध्य करण्याची उमेद गमावली, माझी महत्वाकांक्षा हरवली. पण देवाने आपल्याला घडवले आणि केवळ देवच आपल्याला आपण बनवलेल्या अडथळ्यांमधून बाहेर काढतो.”. तसंच तिने ५ वर्षांच्या गॅपने गणपती बाप्पाला घरी आणले असून आता आमच्यावर त्यांची कृपा दृष्टी राहू दे असे ही तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
कविताच्या घरी कॉमेडियन कपिल शर्मा, भारती सिंह आणि संभावना सेठ सह इतर मित्र-परिवाराने गणपतीच्या दर्शनसाठी उपस्थित होते. कविताने ९ वर्ष ‘FIR’ या मालिकेत चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारली होती त्यानंतर ‘बिग बॉस १४’मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.