‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. शोमध्ये अमिताभ स्पर्धकांशी खूप गप्पा मारत खेळ पूर्ण करताना दिसतात. हा शो नेहमीच स्पर्धकांनी सांगितलेल्या त्यांच्या संघर्षाच्या गोष्टींमुळे आणि अमिताभ यांनी सांगितलेल्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. मात्र, यावेळी शोमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. तर कलाकारांनी अमिताभ बच्चन यांना जया बच्चन यांच्या विषयी काही प्रश्न विचारले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी मालिकेतील मिसेस हाथी यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अंबिका रंजनकर अमिताभ यांना विचारतात, ‘जयाजी भाव करतात का?’ यावर उत्तर देत अमिताभ बोलतात, ‘कोणती स्त्री आहे जी भाव करत नाही?’ तर दुसरीकडे मिसेस सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बंसीवालने अमिताभ यांना विचारले की ‘त्यांची पत्नी जयाजी त्यांना पार्टी करण्यापासून थांबवतात का?’ यावर अमिताभ म्हणाले, ‘बिल्कुल नाही, कारण ती स्वत: पार्टी करते.’ हे ऐकल्यानंतर सगळे लोक हसू लागतात.

आणखी वाचा : आराध्या बच्चनची ‘ती’ भविष्यवाणी ऐकून बच्चन कुटुंबियांना बसला होता धक्का

आणखी वाचा : ‘हा चित्रपट नसून सॉफ्ट पॉर्न फिल्म…’, आयुषमानच्या चित्रपटावर अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया

या महिन्याच्या सुरुवातीला ‘केबीसी’ने १ हजार एपिसोड पूर्ण केले. अमिताभ शोच्या सुरुवातीपासून ‘केबीसी’चे सुत्रसंचालन करत आहेत. तर या निमित्ताने अमिताभ यांनी त्यांच्या मुलीला श्वेताला आणि नात नव्या नवेली नंदाला बोलावले होते. यावेळी जया या व्हिडीओ कॉल द्वारे शोमध्ये उपस्थित राहिल्या होत्या. फक्त २००७ मध्ये ‘केबीसी’चे ३ सीजन शाहरुख खानने सुत्रसंचालन केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kbc 13 amitabh bachchan gave a funny answer to the question related to jaya bachchan know the story dcp