‘कौन बनेगा करोडपती’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोचे १३ पर्व सुरु आहे. यावेळी भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्ज खेळाडू सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी हजेरी लावली होती. यावेळी या दोघांनी ही अमिताभ यांच्यासोबत गप्पा मारल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोच्या सुरुवातीला अमिताभ म्हणाले की ‘केबीसी १३’ मध्ये सौरव आणि वीरेंद्र या दोघांनी हजेरी लावल्याने त्यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. यावर सौरव म्हणाले, ‘सर ही परवानगीची गोष्ट नाही, आम्हाला सांगण्यात आलं की बच्चन साहेब यांनी आम्हाला बोलावले आहे, तर आम्ही कुठूनही येऊ. ‘सौरव यांचे हे उत्तर ऐकून अमिताभ हसू लागतात आणि सौरव यांची थट्टा करत बोलतात, ‘आम्ही ऐकल आहे की तुम्ही लोकांना खूप वेळ प्रतीक्षा करण्यास भाग पाडतात.’

आणखी वाचा : कॉमेडियन सिद्धार्थ सागरला पुन्हा लागले ड्रग्सचे व्यसन, आईने पाठवले रिहॅब सेंटरला

यावर सौरव यांनी २००१ च्या कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉची नाणे फेकण्याची वाट पाहण्यामागची कहाणी सांगितली. सौरव म्हणाले, ‘पहिल्यांदा मला ब्लेझर मिळाले नाही आणि मैदानावर जाण्याची वेळ आली. मी दुसऱ्याचे ब्लेझर घालून मैदानावर गेलो. स्टीव्ह बराच वेळ थांबला आणि चिडलेला दिसत होता. त्यानंतर आम्ही कसोटी सामना जिंकला, मग दुसऱ्यांदा आम्ही ते मुद्दाम करत होतो, कारण एक दबाव असतो, गुड लक आहे की त्याच्याने आम्ही कसोटी सामना जिंकलो. ५ मिनिटे थांबा, त्याने कसोटी सामना जिंकू.’

आणखी वाचा : “मी पॅन्टवर अंडरवेअर परिधान केली तेव्हा मला…” प्रियांका चोप्राचं ‘त्या’ प्रश्नावर मजेशीर उत्तर

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या दर्शकांना सांगितले की, सौरव यांनी ‘के होबे बंगलार कोटीपोटी’ या गेम शोच्या बंगाली ‘कौन बनेगा करोडपती शो’चे सुत्रसंचालन केले आहे. पुढे ते गमतीने म्हणाले, ‘माझी नोकरी धोक्यात येईल.’ यानंतर, सौरव म्हणाले, ‘जेव्हा मी ते पहिल्यांदा केले होते, तेव्हा मी सराव तर करायचो, पण त्यासोबत तुमचे केबीसीचे व्हिडीओसुद्धा पाहायचो.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kbc 13 amitabh bachchan jokes he is in danger of losing his because of virender sehwag complaint to virender sehwag dcp