छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. या शोचे सुत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. शोमध्ये उपस्थित असलेल्या स्पर्धकांसोबत अमिताभ गप्पा मारतात आणि अनेक किस्से सांगतात. यावेळी देखील अमिताभ यांनी शोमध्ये उपस्थित असलेल्या चिराग मांडोतसोबत गप्पा मारत असताना सांगितलं की ते एकदा पूर्ण रात्र वर्तमानपत्राच्या ऑफिसबाहेर थांबले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिराग मुंबईत एक ट्युशन चालवतात. चिराग यांच्या कोचिंग सेंटरचे नाव मयंक ट्यूटोरियल आहे. चिराग यांचे हे कोचिंग सेंटर त्याच्या भावाच्या नावावर आहे. या कोचिंग सेंटरमध्ये काम सुरू करण्यापूर्वी चिराग परदेशात डेटा सायंटिस्ट म्हणून कार्यरत होते. हे कोचिंग सेंटर त्याच्या भावाने २०१३ मध्ये स्वतःच्या नावाने सुरू केले होते परंतु सप्टेंबर २०१९ मध्ये भावाच्या हत्येनंतर त्यांनी नोकरी सोडली आणि या कोचिंग सेंटरचा पदभार स्वीकारला.

आणखी वाचा : आर्यनची केस लढणारे सतीश मानशिंदे एका दिवसासाठी घेतायत इतकी फी…

आणखी वाचा : आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या क्रूझवरील पार्टीचा व्हिडीओ आला समोर

पुढे चिराग यांनी अमिताभ यांना सांगितले की जेव्हा ते त्यांचे नाव घेतात तेव्हा त्यांना खूप छान वाटतं. याविषयी बोलताना अमिताभ यांनी त्यांच्या थिएटरच्या सुरुवातीच्या दिवसांचा किस्सा सांगितला. “कॉलेजनंतर, जेव्हा आम्ही एक थिएटर आर्टिस्ट म्हणून काम केले, तेव्हा आम्ही आमच्या नाटकाचे रिव्ह्यू एका नावाजलेल्या वृत्तपत्रात वाचण्यासाठी खूप उत्सुक असायचो, आम्हाला कोणत्या प्रकारचा रिव्ह्यु मिळेल याविषयी आम्ही रात्रभर विचार करायचो. आम्ही वर्तमानपत्राची वाट पाहत त्यांच्या ऑफिसच्या बाहेर रात्रभर वाटा पाहायचो आणि वर्तमानपत्र वाटायला सुरुवात होताच, आम्ही ते हिसकावून घ्यायचो आणि जर आमचं नावं त्या वर्तमानपत्रात असेल तर आम्हाला खूप आनंद व्हायचा. त्यामुळे तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मी समजू शकतो, असे अमिताभ म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kbc 13 amitabh bachchan shares he would wait whole night outside a newspapers office know the reason dcp