‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सामील होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी भेट होणं ही आनंदाची बाब असते. हॉटसीटवर बसलेल्या प्रत्येक स्पर्धकासोबत ते मनसोक्त गप्पा मारतात. त्यांच्या आयुष्यातील सुख दु:ख जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तर अनेकदा बिग बी स्वत:च्या आयुष्यातील आणि करिअरमधील अनेक किस्से देखील शोमध्ये शेअर करत असतात. नुकताच बिग बींनी एक धमाल किस्सा शेअर केलाय.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी बिग बींना आपल्या मित्रांसोबत फिरण्याची आवड होती. मात्र यामुळे एकदा ते अडचणीत सापडले होते. बिग बींनी नुकतात कौन बनेगा करोडपतीच्या भागात हा धमाल किस्सा शेअर केलाय. हॉटसीटवर बसलेल्या हिंशु रविदास या स्पर्धकाला बिग बींनी पाच हजार रुपयांसाठी एक प्रश्न विचारला. हा प्रश्न रेल्वेतील टीसीसंदर्भातील होता. यानंतर बिंग बींनी हिंशु यांना तुम्हाला कधी टीसीने पकडलं आहे का ? असा सवाल विचारला. यावर हिंशु यांनी हो असं उत्तर देत हाच प्रश्न बिग बींना विचारला.
अमिताभ यांची लेक श्वेताला वाटते ‘या’ एका गोष्टीची भीती
स्पर्धकाच्या प्रश्नावर उत्तर देत बिग बींना त्यांना देखील एकदा टीसीने पकडल्याचा किस्सा सांगितला. “मी कॉलेजात असताना मलाही एकदा टीसीने पकडलं होतं. माझ्याकडे नोकरी नव्हती आणि जास्त पैसैदेखील नसायचे. तेव्हा मित्रांनी फिरण्याचा प्लॅन केला. पहिले तर मी तयार नव्हतो मात्र सगळ्यांनी आग्रह केल्याने मी तयार झालो. जाताना काही अडचण आली नाही मात्र येताना आम्हाला टीसीने पकडलं. तिकीट नसल्याचं जसं आम्ही टीसीला सांगितलं त्यांनी मला ट्रेनमधून खाली उतरण्यास सांगितलं. मात्र मी ट्रेनच्या डब्याच्या हॅण्डलला पकडून लटकलो. काठगोदाम ते दिल्ली पर्यंत आम्ही असा लटकूनच प्रवास केला.”
दोन घटस्फोटानंतर तिसऱ्या पतीपासूनही विभक्त होणार ‘ही’ अभिनेत्री; कारण ऐकून बसेल धक्का
याआधी देखील बिग बींनी त्याच्या आयुष्यातील असे अनेक धमाल किस्से चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तर बऱ्याचदा त्यांनी त्यांच्या संघर्षाच्या काळातील अनुभव शेअर करत अनेकांना प्रेरणा दिली आहे.