छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. या शोचे सुत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. या शोमध्ये ‘शानदार शुक्रवार’ असा एक एपिसोड असतो. आगामी एपिसोडमध्य़े बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया हजेरी लावणार आहेत. त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ते यावेळी कर्करोगग्रस्त मुलांसाठी निधी गोळा करण्यासाठी आले आहेत.
शानदार शुक्रवारचा हा प्रोमो सोनी टिव्हीच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश बोलतो, “त्या मुलांना काय वाटत असेल हे कधीच समजू शकत नाही.” तर त्या मुलांविषयी बोलताना जिनिलियाला रडू कोसळते. पुढे रितेश अमिताभ यांच्या ‘शहंशाह’ या चित्रपटातील एक डायलॉग बोलतो, “रिश्ते में हम तुम्हारे पती लगते है, लेकीन नाम है जिनिलियाचा नवरा.” हे ऐकून उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हसू लागतात.
आणखी वाचा : आर्यनची केस लढणारे सतीश मानेशिंदे एका दिवसासाठी घेतायत इतकी फी…
आणखी वाचा : “फक्त बॉलिवूडवर…”; क्रांती रेडकरने NCB च्या कारवाईवर व्यक्त केली प्रतिक्रिया
दरम्यान, या आधी ‘शानदार शुक्रवार’मध्ये सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी हजेरी लावली होती. तर गणेशोत्सव आणि शानदार शुक्रवारच्या निमित्ताने दीपिका पादूकोण आणि फराह खानने हजेरी लावली होती. त्यानंतर टोक्यो ऑल्मिपिकमध्ये भारतासाठी पदक मिळवत आपल्या देशाचे नाव उंच करणारा भारताचा गोल्डन बॉय आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि भारतीय हॉकी टीमचा गोलकिपर पीआर श्रीजेश यांनी हजेरी लावली आहे. त्यानंतर, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, पंकज त्रिपाठी आणि प्रतिक गांधी यांनी हजेरी लावली होती.