छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा लोकप्रिय शो आहे. यंदाचे ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. या शोला एवढ्यातच त्याची पहिले करोडपती स्पर्धक मिळाली आहे. स्पर्धक हिमानी बुंदेल असे त्या स्पर्धकाचे नाव आहे. हिमानी या आता ७ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत. त्यांनी १ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि त्या ‘कौन बनेगा करोडपती १३’ च्या पहिल्या विजेता ठरल्या आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा प्रोमो सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये हिमानी यांनी १ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि त्या शोच्या पहिल्या करोडपती ठरल्या आहेत. आता हिमानी या ७ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देताना आपल्याला आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहेत. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हे हिमानी यांची स्तुती करताना दिसत आहेत.

आणखी वाचा : अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेतील हेड कॉन्स्टेबलची बदली; वर्षाला घेत होता दीड कोटी पगार

आणखी वाचा : ५६ वर्षांच्या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केले लग्न, फोटो व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी हिमानी यांना शुभेच्छा देत आहेत. अपंग मुलांसाठी समाजात जागरुकता आणण्याची मोहिम हिमांगी यांनी त्यांच्या हाती घेतली आहे. या शोमधून जिंकलेल्या सगळ्या पैशांचा वापर हिमानी या त्यांच्या मोहिमेसाठी करणार आहेत.

Story img Loader