‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. कौन बनेगा करोडपतीला त्यांचा तिसरा करोडपती भेटला आहे. गीता सिंह गौर असे त्यांचे नाव आहे. गीता या गृहीणी आहेत. गीता यांनी १ कोटीच्या प्रश्नाचे अचुक उत्तर दिले आहे. आता त्या ७ कोटी रुपयाच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोचा हा प्रोमो सोनी टिव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये ५३ वर्षाच्या गीता बोलतात की माझं संपूर्ण आयुष्य हे मुलांचा सांभाळ करण्यात घालवलं आहे. आता माझ्या आयुष्याची सेकेंड इनिंग मला स्वत: साठी जगायचे आहे. प्रोमोमध्ये गीता या जीप चालवताना देखील दिसत आहेत.

आणखी वाचा : फोटो बच्चन कुटुंबाचा पण चर्चा मात्र भिंतीवरच्या पेंटिंगची, किंमत ऐकलीत का?

आणखी वाचा : कौतुकास्पद : माधुरीच्या मुलाने दोन वर्षे केस का वाढवले? व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

प्रोमोमध्ये शेवटी शोचे सुत्रसंचालक अमिताभ बच्चन एक कोटी रुपये जिंकलात असं गीता यांना बोलतात. गीता या साहिल अहिरवाल आणि हिमानी बुंदेला यांच्यानंतर कोटी रुपये जिंकणाऱ्या तिसऱ्या करोडपती ठरल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kbc 13 house wife geeta singh gaur becomes third millionaire declared by amitabh bachchan dcp