माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ या शोचे तेरावे पर्व सुरु असून अमिताभ बच्चन हे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. शुक्रवारच्या एपिसोडमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेची संपूर्ण टीम आली आहे. या मालिकेतील कलाकार अमिताभ यांच्यासोबत मजा मस्ती करताना दिसतात. दरम्यान बाघा आणि अय्यरने विचारलेल्या प्रश्नांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अय्यर अमिताभ यांना प्रश्न विचारतो की, ‘सर जर तुमच्या बाल्कनीकडे कोणी लक्ष ठेवत असेल तर तुम्ही काय कराल.’ त्यावर मजेशीर अंदाजात उत्तर देत बिग बी म्हणाले, ‘मी पण त्याच्याकडे पाहात राहिन. ज्या प्रकारे तो माझ्याकडे पाहतो.’ ते ऐकून सर्वांना हसू अनावर होते.
आणखी वाचा : शाही थाट! विकी कौशलने कतरिनाला घातलेल्या डायमंडच्या अंगठीची किंमत माहितीये का?

त्यानंतर बाघाने देखील एक प्रश्न विचारला आहे. ‘सर मी एका चाळीत राहतो, अनेकदा आम्हाला पाण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे शेजाऱ्यांकडे एक बादली भरुन अंघोळीसाठी पाणी मागावे लागते. तुम्हाला अशी कधी समस्या आली होती का?’ असा प्रश्न बाघाने विचारला. त्यावर अमिताभ यांनी उत्तर देत ‘हो मी शेजाऱ्यांकडूनच पाणी आणून रोज अंघोळ करत असतो’ असे म्हटले. ते ऐकून सर्वांना हसू अनावर होते.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील २१ कलाकार अमिताभ यांच्यासोबत मजा मस्ती करताना दिसत आहेत. अशातच दिलीप जोशी हॉट सीटवर बसलेले असतात.