‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. शोमध्ये शानदार शुक्रवार असा एक शुक्रवारचा एपिसोड असतो. त्या दिवशी सेलिब्रिटी हजेरी लावतात. तर शुक्रवारी येणाऱ्या एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अमिताभ यांनी पोळी बनवल्याचे दिसत आहे.

हा प्रोमो सोनी टिव्हीच्या अधिकृक अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये आयुषमान खुराना, वाणी कपूर, दिशा परमार, नेहा कक्कड, बादशाह, मनीश पॉल यांनी हजेरी लावल्याचे दिसत आहे. सुरुवातीला नेहा अमिताभ यांच्या ‘कभी कभी’ या चित्रपटातलं टायटल गाणं गाताना दिसते. तर बादशाह त्याचं ‘जुगनू’ या गाण्यावर अमिताभ यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. त्यावर अमिताभ बोलतात की “आज कंबरपण हलवली, पायपण हलवले आता जीम जान बंद.”

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’ सोनूच्या बॉयफ्रेंडला पाहिलत का?

तर शोमध्ये आयुषमानने अमिताभ यांच्यासोबतचा ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटातला एक सीन रिक्रिएट केला. दिशा परमार, मनीष पॉल आणि इतर सेलिब्रिटी पोळी बनवण्याची एका स्पर्धा सहभागी होतात. काहींची पोळी गोल झाली मात्र, अमिताभ यांच्या पोळीचा आकार हा गोल नसून कोणत्या देशाचा नकाशा आहे हे देखील कळत नाही आहे. एवढचं काय तर त्यांची पोळी चारही बाजूंनी फाटली. त्यांच्या पोळीचा आकार पाहून सगळे हसू लागतात.

आणखी वाचा : आराध्या बच्चनची ‘ती’ भविष्यवाणी ऐकून बच्चन कुटुंबियांना बसला होता धक्का

या महिन्याच्या सुरुवातीला ‘केबीसी’ने १ हजार एपिसोड पूर्ण केले. अमिताभ शोच्या सुरुवातीपासून ‘केबीसी’चे सुत्रसंचालन करत आहेत. तर या निमित्ताने अमिताभ यांनी त्यांच्या मुलीला श्वेताला आणि नात नव्या नवेली नंदाला बोलावले होते. यावेळी जया या व्हिडीओ कॉल द्वारे शोमध्ये उपस्थित राहिल्या होत्या. फक्त २००७ मध्ये ‘केबीसी’चे ३ सीजन शाहरुख खानने सुत्रसंचालन केले आहे.