छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपति १३’ या शोकडे माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिले जाते. या शोमध्ये ‘शानदार शुक्रवार’ असा एक एपिसोड असतो. या एपिसोडमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. यावेळी ‘शोले’च्या टीमचे रियुनीय होणार आहे. केबीसीमध्ये शोले चित्रपटाचे निर्माते रमेश सिप्पी आणि अभिनेत्री हेमा मालिनी दिसणार आहेत. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
‘केबीसी’चा हा प्रोमो सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी रमेश सिप्पी यांनी अमिताभ यांना चित्रपटात कसे कास्ट केले या विषयी सांगितले. ते म्हणाले, ‘आनंद’ आणि ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील अमिताभ यांची भूमिका पाहिल्यानंतर त्यांना वाटले की ते कोणतीही भूमिका उत्तम साकारू शकतात. तर दिग्दर्शकाने कौतुक केल्याचे पाहून बिग बी आनंदी होतात.
आणखी वाचा : “जेव्हा माझ्या ११ वर्षाच्या मुलाचे निधन झाले तेव्हा शाहरूख…”, शेखर सुमनचे ट्वीट व्हायरल
पुढे अमिताभ देखील चित्रपटातील एक मजेशीर किस्सा सांगतात. ‘शोले’चा लोकप्रिय सीन जिथे अमिताभ पायऱ्यांवर बाजा वाजवत असतो, जया बंगल्याच्या व्हरांड्यात उभी राहून दिवे मालवत असते. या सीनच्या पाठी असलेलं जे आकाश आहे, त्यात संध्याकाळच्या रंगांची उधळण झाली आहे. त्या आकाशासाठी रमेश सिप्पी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने वाट पाहिली होती. हा सीन शूट करण्यासाठी त्यांना तब्बल साडेतीन वर्षे लागली. या एपिसोडमध्ये धर्मेंद्र हे व्हिडीओ कॉल द्वारे उपस्थित राहतात. त्यावेळी ते संपूर्ण टीमला आठवण करून देतात की कश्या प्रकारे ते २८ किलो मीटर पायी चालत गेले होते.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 3 : महेश मांजरेकरांची एका दिवसाची ‘मानधनाची रक्कम’ ऐकलीत का?
पुढे अमिताभ धर्मेंद्र यांच्यासोबत मस्ती करत बोलतात, जर त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला तर धर्मेंद्र त्यांना मारतील. या व्यतिरिक्त अमिताभ आणि हेमा मालिनी ‘दिलबर मेरे’ हे गाणं पुन्हा एकदा रिक्रिएट करतात. हा एपिसोड येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.