‘कौन बनेगा करोडपती’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोचे १३ पर्व सुरु आहे. यावेळी भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्ज खेळाडू सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी केबीसीच्या ‘शानदार शुक्रवार’ या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. यावेळी या दोघांनी ही अमिताभ यांच्यासोबत गप्पा मारल्या. एवढंच नाही तर त्यांनी २५ लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

‘केबीसी १३’ मध्ये सौरव आणि वीरेंद्र यांनी त्यांच्या क्रिकेट मॅच आणि टीममधील अनेक किस्से सांगितले आहे. याची सुरुवात ही कोलकाताच्या स्ट्रीट फूड मुरीशीपासून झाली. यावेळी अमिताभ यांनी सांगितले की त्यांनी कोलकातामध्ये झाल मुरी खा खाऊन महिने घालवले होते. तर सौरव यांना पुच्का ही डीश प्रचंड आवडते. यापुढे वीरेंद्र यांनी सांगितले की त्यांना छोले कुलच्छा प्रचंड आवडतो. तर सौरव म्हणाले, ‘पुच्कापेक्षा चांगलं काही नाही.’

आणखी वाचा : ‘माझी नोकरी धोक्यात येईल’, अमिताभ यांनी वीरेंद्र सेहवागकडे सौरव गांगुलींची केली तक्रार

त्या दोघांनी १२.५ लाख रुपयांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी दोन लाईफलाईन फ्लिप द क्वेश्न आणि आस्क द एक्सपर्ट वापरले. त्यांनी विक्रांत गुप्तांच्या मदतीने अचूक उत्तर दिले. २५ लाखाच्या प्रश्नाचे उत्तर गांगुली यांना माहित नव्हते तर वीरेंद्र यांनी त्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले.

२५ लाखसाठी कोणता प्रश्न विचारण्यात आला?

आझाद हिंद रेडिओ ही रेडिओ सेवा १९४२ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू झाली?

A) जपान
B) जर्मनी
C) सिंगापूर
D) बर्मा

असे चार पर्याय देण्यात आलेले. सौरव यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर माहित नव्हते. तर वीरेंद्र यांनी या प्रश्नाचे अचूक उत्तर देत २५ लाख रुपये जिंकले. यावेळी सौरव आणि वीरेंद्र यांनी अमिताभ यांच्याशी गप्पामारत क्रिकेटच्या मैदानातील अनेक किस्से सांगितले. त्यापैकी एक म्हणजे, अमिताभ यांनी सौरव यांना प्रश्न विचारला की ‘आम्ही ऐकल आहे की तुम्ही लोकांना खूप वेळ प्रतीक्षा करण्यात भाग पाडतात.’ यावर सौरव यांनी २००१ च्या कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉची नाणे फेकण्याची वाट पाहण्यामागची कहाणी सांगितली. सौरव म्हणाले, ‘पहिल्यांदा मला ब्लेझर मिळाले नाही आणि मैदानावर जाण्याची वेळ आली. मी दुसऱ्याचे जॅकेट घालून मैदानावर गेलो होतो. स्टीव्ह बराच वेळ थांबला आणि चिडलेला दिसत होता. त्यानंतर आम्ही कसोटी सामना जिंकला, तर दुसऱ्यांदा आम्ही ते मुद्दाम करत होतो, कारण एक दबाव असतो, गुड लक आहे की त्याच्याने आम्ही कसोटी सामना जिंकलो. ५ मिनिटे थांबा, त्याने कसोटी सामना जिंकू.’

Story img Loader