माहितीचा स्त्रोत म्हणून छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ पाहिला जातो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. आता या शोचे १३ वे पर्व सुरु आहे. या एपिसोडचा ‘स्टूडंट्स वीक स्पेशल’ सध्या सुरु झाला आहे. या एपिसोडचे काही प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात लहान लहान मुलं हे अमिताभ यांना अनेक वेगवेगळे प्रश्न विचारतात.

‘केबीसी’चा असाच एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात एक लहान मुलगा असा प्रश्न विचारतो की स्टुडिओमध्ये असलेले सगळे प्रेक्षक आणि अमिताभ हसू लागतात. तो मुलगा अमिताभ यांना विचारतो, ‘तुम्ही एवढे उंच आहात तर तुम्ही घरी पंखे साफ करतात का?’

हा मुलगा इथेच थांबत नाही तर तो पुढे विचारतो ‘जेव्हा आराध्याचं अॅन्युअल फंक्शनला अमिताभ जातात तेव्हा लोक त्यांना बघतात की फंक्शन?’ पुढे तो विचारतो की ‘लहान असताना अमिताभ यांना त्यांच्या आईने अभ्यास केला नाही म्हणून कधी मारलं आहे का?’ यावर बिग बी हसत बोलतात की ‘हा खूप चांगला मुलगा आहे, हा माझी पोल खोलणार.’

आणखी वाचा : जुही चावला झाली अलिबागकर…विकत घेतलेल्या जागेची किंमत ऐकलीत का?

दरम्यान, या आधी शोचा ‘शानदार शुक्रवार’ हा एपिसोड प्रचंड लोकप्रिय झाला होता. या एपिसोडमध्ये अभिनेता सोनू सूद आणि कॉमेडीयन कपिल शर्माने हजेरी लावली होती. कपिलने त्याचे विनोद सांगत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

Story img Loader