माहितीचा स्त्रोत म्हणून छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ पाहिला जातो. सध्या कौन बनेगा करोडपतीचे १३ वे सीझन सुरु आहे. या शोचे सुत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ला त्यांचा तिसरा करोडपती भेटला आहे. गीता सिंह गौर असे त्यांचे नाव आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की गेल्या १७ वर्षांपासून केबीसीसाठी प्रयत्न करत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गीता यांनी हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी हा खुलासा केला आहे. लग्न झाल्यानंतर गीता यांनी शिक्षण सोडले होते. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी लॉ करण्याचा निर्णय घेतला. त्या आता ५३ वर्षांच्या आहेत. त्यांच्या प्रवास सांगताना त्या म्हणाल्या, “जेव्हा केबीसी सुरू झाला, तेव्हा मला वाटलं की मी एक दिवस या स्टेजवर पोहोचावे. मी स्वतःला सांगितले की जर मी तिथे पोहोचले तर संपूर्ण जगात माझी एक ओळख निर्माण होईल. गेल्या १६ ते १७ वर्षांपासून मी यासाठी तयारी करत आहे. मी या शोसाठी खूप वेळा प्रयत्न केले, बऱ्याचवेळा ऑडिशनही दिले.”

आणखी वाचा : ‘टिप टिप बरसा पाणी’ गाण्याच्या रिमेकमध्ये कतरिनाला पाहून रवीना म्हणाली…

पुढे त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या समोर जाताना किती भीती वाटली ते सांगितले. “एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर बसून कसे वाटले असा प्रश्न मला पडायचा. पण ते तुम्हाला कुटुंबातील सदस्य असल्याचा भास करून देतात आणि त्यामुळे तुमची सर्व भीती दूर होते. मी तिथे बसण्यापूर्वी मला भीती वाटत होती. त्यानंतर मला अजिबात भीती वाटली नाही.”

आणखी वाचा : “आपण हिंदू की मुस्लीम?” आर्यन, सुहानाच्या प्रश्नावर शाहरुखने दिले होते ‘हे’ उत्तर

ती पुढे म्हणाली, “ते तुम्हाला असे वाटू देत नाही, की ते देशातले सर्वात मोठे सुपरस्टार आहेत आणि तुम्ही एक सामान्य व्यक्ती आहात. तुम्हाला अनेक गोष्टी माहित असून तुम्ही जाणकार आहात अशी जाणीव करून देतात. यासोबत मी जेव्हा हॉटसीटवर गेली तेव्हा त्यांनी माझ्या पारंपारिक राजपुतानाच्या पोशाखाचे कौतुक केले आणि मी भारावून गेलो. त्याचवेळी माझी सर्व भीती नाहीशी झाली.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kbc 13 third crorepati geeta singh gour reveals how amitabh bachchan put her at ease role her rajputana dress played dcp