अनेकांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा १४ वा सिझन सात ऑगस्टपासून सुरू होतोय. या नव्या सिझनच्या पहिल्या एपिसोडचा प्रोमो देखील रिलीज करण्यात आलाय. या खास एपिसोडला अभिनेता आमिर खान हजेरी लावणार आहे. या भागात बिग बी अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडचा मिस्टर परफेश्कनिस्ट आमिर खानमध्ये धमाल गप्पा रंगताना पाहायला मिळणार आहेत.
‘कौन बनेगा करोडपती १४’च्या पहिल्या एपिसोडचे दोन प्रोमो रिलीज करण्यात आले आहेत. यात बिग बी आमिरसोबत धमाल करताना दिसताय. यावेळी आमिर आपण केवळ मित्रांच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी ट्विटरचा वापर करत असल्याचं म्हणाला. “मी ट्विटरवर होतो. खरं तर त्यासाठी अमिताभजींचे धन्यवाद. मात्र माहित नाही का पण माझ्याकडून काही ट्वीट होतचं नव्हत. मग मी माझ्या मित्रांच्या सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी ट्वीट करू लागलो.” असं आमिर म्हणाला.
एखाद्याची फिरकी घेणं अमिताभ बच्चन यांना चांगलचं जमतं. आमिरसोबत त्यांनी काहिसं असंच केलं. “तुम्ही ट्विटरवर अनेक सिनेमांचं प्रमोशन केलंय, केबीसीचं प्रमोशन नाही करणार का?” बिग बींच्या या प्रश्नावर आमिरनेही चातुर्याने उत्तर दिलं, “केबीसीला प्रमोशनची गरजच कुठे भासते सर” असं तो म्हणाला.
हे देखील वाचा: “मला हिंदी चित्रपटांची ऑफर मिळाली तेव्हा…” बॉलिवूड पदार्पणाच्या ‘त्या’ प्रश्नावर नागा चैतन्यचे स्पष्ट उत्तर
तर आणखी एका प्रोमोमध्ये बिग बी आमिरला एक व्हिडीओ दाखवून प्रश्न विचारत आहेत. यावर आमिर पुन्हा एकदा व्हिडीओ दाखवण्याची विनंती करतो. आमिरला व्हिडीओ पुन्हा दाखवल्यानंतर बिग बी प्रश्नाकडे वळणार तोच आमिर पुन्हा एकदा त्याला बारकाईने व्हिडीओ पाहायचा असल्याचं सांगत व्हिडीओ पाहण्याची विनंती करतो. आमिरने अगदी स्क्रिन समोर उभं राहून व्हिडीओ पाहिल्याचं दिसतंय. यावेळी बिग बींनी त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणत पुन्हा डिवचलं. “जोवर सर्व काही परफेक्ट होत नाही तोवर यांना शांती मिळणार नाही.” असं बिग बी म्हणाले.
हे देखील वाचा: “पैसे खाल्ले की नाही…” संजय राऊतांवरील ईडी कारवाईवर आरोह वेलणकरचं ट्वीट चर्चेत
‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या मंचावर कायमत वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या सेलिब्रिटींसोबत बिग बी अमिताभ बच्चन मनसोक्त गप्पा मारतात. तसचं अनेकदा हे सेलिब्रिटी या मंचावर बॉलिवूडमधील खास किस्से देखील शेअर करतात.