‘कौन बनेगा करोडपती’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो प्रेक्षक आवडीने पाहतात. बिग बी अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या या शोचा १४वा सीझनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात राजस्थानमधील एक शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१६ वर्षं संसार सांभाळून शिक्षिका बनलेल्या शिक्षिका शोभा कानवर यांच्या कार्याची माहिती देणारा व्हिडीओ ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये दाखवण्यात आला. शोभा यांना मुलबाळ नाही, त्यामुळे त्यांनी इतर मुलांना खुश ठेवता यावं यासाठी शिक्षकाचा पेशा पत्करला. या प्रवासाविषयी बोलताना शोभा यांनी केबीसीचे आभार मानले. त्या म्हणाल्या, “केबीसीमधून मला खूप काही शिकायला मिळालं. मी रोज केबीसी पाहायचे. केबीसीमुळेच मी शिक्षिका झाले. मला मुलबाळ नाही पण आता माझ्याकडे शाळेतील ४५० मुलं आहेत.”

हेही वाचा >> “माझी आई बिग बॉस पाहत नाही , कारण…”, सलमान खानने केला खुलासा

हेही वाचा >> “मला रणबीर कपूरला कंडोम…”, दीपिका पदुकोणची ‘ती’ इच्छा ऐकून संतापले होते ऋषी कपूर

शोभा यांची ही जीवनगाथा ऐकून अमिताभ बच्चन भारवून गेले. ते भावून होऊन म्हणाले, “जगात दोनच व्यक्ति देवासमान असतात, एक आई आणि दूसरी शिक्षक आणि तुम्ही या दोन्ही भूमिका बजावता, त्यासाठी तुमचे अभिनंदन.” अमिताभ बच्चन यांनी शोभा यांच्या शाळेतील मुलांसाठी देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली. “यापूर्वी मी असं कधीच केलं नाही आहे. परंतु, मुलांप्रति आणि त्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही करत असलेलं कार्य पाहून मी तुम्हाला ही मदत करू इच्छितो”, असं अमिताभ बच्चन म्हणाले.

हेही वाचा >> Viral Video मुळे फेमस झाला अन् अहमदनगरच्या शाळकरी मुलाला अजय-अतुलने दिली थेट चित्रपटात गाण्याची संधी

शोभा कानवर यांनी केबीसीमध्ये ६ लाख ४० हजार रक्कम जिंकली. १ लाख ६० हजारच्या प्रश्नापर्यंत त्यांनी एकही लाइफलाइन वापरली नव्हती. परंतु, ६ लाखांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांच्याजवळील ५०-५० आणि व्हिडीओ कॉल या लाइफलाइन वापरुन योग्य उत्तर दिलं. पुढील प्रश्नाचं उत्तर ठाऊक नसल्याने आणि कोणतीही लाइफलाइन शिल्लक न राहिल्यामुळे शोभा यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kbc 14 amitabh bachchan want to donate money for shobha kanwar school students kak