‘कौन बनेगा करोडपती’ या शोचं नुकतचं चौदावं पर्व सुरू झालं आहे. नेहमीप्रमाणेच बिग बी अमिताभ बच्चन या पर्वातही स्पर्धकांबरोबर धमाल करताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या भागात प्रोफेसर धुलिचंद यांना हॉट सीटवर बसण्याची सुवर्णसंधी मिळाली. फास्टेस्ट फिंगरची फेरी जिंकल्यानंतर हॉटसीटवर बसण्यापूर्वी धुलीचंद यांनी संपूर्ण मंचाला तीन प्रदक्षिणा मारल्या. या शोचा मंच म्हणजे त्यांच्यासाठी मंदिर असून गेल्या २१ वर्षांपासूनचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं असल्याचं ते म्हणाले.
या खास भागात स्पर्धक धुलिचंद यांनी बिग बींसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी एक खास किस्सा शेअर केला. बिग बींकडे १० रुपये उधार असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी या १० रुपयाचा किस्सा सांगितला. “मला तुमचा मुकद्दर का सिकंदर सिनेमा पाहायचा होता. सिनेमा पाहण्यासाठी १० रुपये पुरतील असा अंदाज लावून मी कसेबसे १० रुपये जमवले. त्यानंतर कित्येक मैल पायी चालून गेलो. तिकिटासाठी बरेच तास लाईनमध्ये उभा राहिलो आणि जेव्हा माझा नंबर येणार तेव्हाच नेमकी तिकीट खिडकी बंद झाली. त्यानंतर तिकिटासाठी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी धक्काबुक्कीत मी जमिनीवर पडलो आणि माझ्या डोक्याला मार लागला.” अशाप्रकारे धुलिचंद यांनी रंगवून किस्सा सांगितला.
हे देखील वाचा: तापसी पन्नूशी फोटोग्राफर्सनी घातला वाद, हात जोडत अभिनेत्री म्हणाली “तुम्ही नेहमीच…”
पुढे धुलिचंद यांनी सांगितलं की त्यांनंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांचा एकही सिनेमा न पाहण्याची शपथ घेतली. शिवाय एके दिवशी तरी अमिताभ बच्चन यांच्या समोर त्यांना हा किस्सा शेअर करू आणि त्यांच्यासोबत सिनेमा पाहू असं स्वप्न ते कायम पाहू लागले. अखेर २१ वर्षांनी त्याचं स्वप्न पूर्ण झालं. ‘कौन बनेगा करोडपती’ शोच्या मंचावर येवून धुलिचंद यांना त्यांचा किस्सा सांगण्याची संधी मिळाली.
हे देखील वाचा: ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा, पोस्ट शेअर करत विकी कौशल म्हणाला…
दरम्यान या भागात अमिताभ बच्चन यांनी धुलिचंद यांना १० रुपयांची नोट काढून दिली. यावेळी तुमचे १० रुपये व्याजसह परत करत असल्याचं ते म्हणाले. तसचं नक्कीच एकत्र सिनेमा पाहू असं आश्वासन बिग बींनी धुलिचंद यांना दिलं. ‘ कौन बनेगा करोडपती’ या शोच्या मंचावर अनेक चाहते बिग बींना भेटण्याचं स्वप्न उराशई बाळगून येतात. या मंचावर धनलभासोबतच स्पर्धकांची अमिताभ बच्चन यांना भेटण्याची इच्छा पूर्ण होते.