कौन बनेगा करोडपती १४’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आहे. अनेक स्पर्धक या शोमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी हॉट सीटवर येतात. होस्ट अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन ते पैसे जिंकतात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी रात्री उशीरा त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांशी शेअर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या शोचा नवा एपिसोड प्रदर्शित झाला आहे. ज्यात कामेश सिंग नावाच्या व्यक्तीने १.५ लाख रुपये गमावले. दोन्ही लाईफलाइन वापरून देखील तो प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. कामेश मूळचा उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे. पेशाने तो शिक्षक आहे. कामेशने आठव्या प्रश्नासाठी जनमताचा कौल ही लाईफलाइन घेतली आणि जनतेने त्याला ८०,००० रुपये जिंकून दिले. तो प्रश्न होता, जून २०२२ मध्ये रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष म्हणून मुकेश अंबानी यांच्यानंतर कोण आले? यावर ४ पर्याय दिले गेले- अनंत अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी आणि ईशा अंबानी इत्यादी. या प्रश्नाचे उत्तर होते आकाश अंबानी.

KBC: रामायणाबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्याने स्पर्धकाने सोडला खेळ, जाणून घ्या काय होता प्रश्न

दहाव्या प्रश्नासाठी त्याने आपल्या दोन लाईफलाईनचा वापर केला पण तरीही योग्य उत्तर मिळू शकले नाही आणि त्याने दीड लाख गमावले. तो प्रश्न असा होता, रामायणानुसार वाल्मिकींचा आश्रम यापैकी कोणत्या नदीच्या काठावर होता? यावरचे पर्याय असे होते – गंगा, यमुना, तमसा आणि सरयू ज्याचे उत्तर होते तमसा.

यापूर्वी रामायणाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर उत्तर माहित नसल्याने एका स्पर्धकाला कार्यक्रम सोडावा लागला होता. “खालीलपैकी कोणते वाल्मिकी रामायणातील कांडाचे नाव नाही?” असा तो प्रश्न होता. याच्या उत्तरासाठी सुंदर कांड, वनवास कांड, युद्ध कांड आणि किष्किन्धा कांड हे चार पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचं उत्तर वनवास कांड होतं. पण हे उत्तर ऋचाला माहित नव्हतं, त्यामुळे तिने ६ लाख ४० हजारांची रक्कम घेत कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला.