Keerthy Suresh Antony Thattil Wedding : मनोरंजन विश्वात सध्या अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. नुकताच दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या दोघांनी कुटुंबीय आणि मित्रमंडळींसमोर सात जन्मांसाठी एकमेकांशी नातं जोडलं. त्यानंतर आता आणखी एक दाक्षिणात्य अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नासाठी कीर्ती बॉयफ्रेंडबरोबर गोव्यात दाखल

अभिनेत्री कीर्ती सुरेश लवकरच बॉयफ्रेंड अँटनी थट्टिल याच्याबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लग्नाची पत्रिका जोरदार व्हायरल होत आहे. तसेच ती बॉयफ्रेंडबरोबर गोव्यात पोहोचली आहे. कीर्ती आणि अँटनीच्या मित्रमंडळींपैकी एकाने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये कीर्ती आणि अँटनीबरोबर अन्य काही जणांची विमान प्रवासाची तिकिटेही आहेत. पुढे कीर्तीनेसुद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो पुन्हा स्टोरीमध्ये ठेवला आहे. अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोवरून समजते की, त्यांची ही तिकिटे चेन्नई ते गोव्यादरम्यानची होती.

हेही वाचा : Bigg Boss 18: सलमान खानच्या शोच्या टीआरपीसाठी धडपड, २६९० कोटींची मालकीण शालिनी पासीची घरात एन्ट्री

कीर्ती आणि अँटनीची लग्नपत्रिका

कीर्ती आणि अँटनी थट्टिल दोघेही लग्नासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. पत्रिकेत लग्नाची तारीख, ठिकाण यांसह सुंदर मजकूर लिहीत सर्वांना आमंत्रण देण्यात आले आहे.

लग्नाची तारीख काय?

कीर्ती आणि अँटनी यांचा विवाह सोहळा १२ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. या लग्नपत्रिकेत लिहिलेय, “तुम्हाला सर्वांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, आमच्या मुलीचे लग्न १२ डिसेंबर रोजी होणार आहे. मुलीसाठी तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी लाखमोलाचे आहेत. आम्ही आशा करतो की, तुम्ही तिच्या सुंदर आयुष्यासाठी प्रार्थना कराल. या दोघांच्या नवीन जीवनातील प्रवासाला तुम्ही आशीर्वाद दिल्यास आम्ही तुमचे फार आभारी राहू.”

१५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये

अभिनेत्री कीर्ती सुरेश १५ वर्षांपासून अँटनी थट्टिलला डेट करीत आहे. गेल्या महिन्यात तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दोघांचा एक फोटो पोस्ट करीत याची माहिती दिली होती. या फोटोला तिने, “१५ वर्षांपासून प्रवास सुरूच…”, अशी कॅप्शन दिली होती.

सौजन्य – सोशल मीडिया
सौजन्य – सोशल मीडिया

हेही वाचा : कर्करोगाशी झुंज देणाऱ्या हीना खानने शेअर केले रुग्णालयातील फोटो; म्हणाली, “उपचाराच्या या ठिकाणी…”

गेल्याच महिन्यात अभिनेत्री तिच्या आई वडिलांबरोबर आंध्र प्रदेशमधील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पोहचली होती. त्यावेळी ती येथे तिचा आगामी चित्रपट हिट ठरावा यासाठी देवाकडे आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे, असं तिने सांगितलं होतं. तसेच “मी पुढील महिन्यात गोव्यामध्ये लग्न करणार आहे.” असं सांगत तिने लग्न करत असल्याचं जाहिर केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keerthy suresh antony thattil wedding card viral actress reached at goa with boyfriend rsj