साऊथ स्टार कीर्ती सुरेश सध्या चांगलीच चर्चेत आहे. किर्ती नुकतीच ‘दसरा’ चित्रपटात दिसली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाबातच्या चर्चांनी जोर धरला आहे. किर्ती दुबईतील एका व्यावसायिकासोबत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. आता या सगळ्यावर कीर्ती सुरेशने मौन सोडले आहे.
हेही वाचा- नयनताराने विकत घेतले ५३ वर्ष जुने थिएटर कारण…
कीर्ती सुरेशचा फरहान नावाच्या व्यक्तीबरोबरचा फोटो काही दिवसांपासून व्हायरल होत होता. कीर्ती फरहानबरोबर रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता खुद्द किर्तीने ट्वीट करत याबाबत खुलासा केला आहे. किर्तीने ट्वीटमध्ये लिहिलं आहे, हाहाहा !! या वेळी माझा खास मित्राला या सगळ्यात ओढायच नव्हतं! जेव्हा मला वाटेल तेव्हा मी त्या ‘मिस्ट्री मॅनला’ सर्वांसमोर आणेन. तोपर्यंत शांत रहा.”. किर्तीच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दसऱ्याचे शेवटचे शूट संपल्यावर कीर्तीने तिच्या सेटवर उपस्थित असलेल्या सर्व लोकांना सोन्याची नाणी वाटली. यावेळी सेटवर १३० लोक उपस्थित होते. कीर्तीने ड्रायव्हरपासून लाईट मॅनपर्यंत सर्वांना सोन्याची नाणी देऊन शूट पूर्ण केले. सोन्याची नाणी वाटल्यावरुन किर्ती खूप चर्चेत आली होती. या नाण्यांची किंमत सुमारे ७० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.