Kerala Film Industry : कोची येथील एका कॅफेत ती बसली होती. समोर असलेल्या चहाच्या कपाला तिने हातही लावला नाही. तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता, त्या रागातच तिने प्रश्न विचारला, आम्हाला सेक्स वर्कर्स सारखं का वागवलं जातं? हा प्रश्न केरळच्या सिनेसृष्टीत ( Kerala Film Industry ) काम करणाऱ्या शिवप्रिया मनिषा या मेक-अप आर्टिस्टचा आहे. तिला आलेले भयंकर आणि तितकेच किळसवाणे अनुभव तिने सांगितले आहेत.

काय सांगितलं आहे या मेक अप आर्टिस्टने?

मल्याळम सिनेसृष्टीत ( Kerala Film Industry ) मागच्या १५ वर्षांपासून काम करणाऱ्या या महिलेने तिला आलेले अनुभव कथन केले आहेत. तिने अनेक चित्रपटांमधील कलाकारांना मेक अप केला आहे. तसंच Prosthetic प्रोस्थेटिक मेक अप कसा करायचा? याचं प्रशिक्षणही घेतलं आहे. सध्या या मेक अप आर्टिस्टने उदरनिर्वाहासाठी नववधूचा मेक अप करण्याचं काम हाती घेतलं आहे. माझ्या हातात सध्या फारसे चित्रपट नाहीत, त्यामुळे मला आता कुणी शय्यासोबत करशील का? हे विचारणार नाही असंही शिवप्रिया मनिषाने सांगत तिची वेदना मांडली.

Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Protest against obscene remarks of BJP leader Pasha Patel in Karjat Jamkhed by burning effigy
भाजप नेते पाशा पटेल यांच्या अश्लील वक्तव्याविरोधात कर्जत जामखेड मध्ये महिलांचा एल्गार, पुतळा जाळून निषेध
Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
maharashtra election 2024 mahim vidhan sabha sada sarvankar viral video
VIDEO: “लाडकी बहीण सांगता मग…”, सदा सरवणकर दारात येताच कोळी महिलेचा संताप; म्हणाली, “घरात नको, तुम्ही बाहेरच…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

हेमा समितीच्या अहवालात धक्कादायक गोष्टी समोर

हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर या अन्यायाच्या या कहाण्या समोर येत आहेत. मल्याळम सिनेसृष्टीत ( Kerala Film Industry ) महिलांना कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं? या गोष्टी यातून बाहेर आल्या आहेत ज्या अर्थातच धक्कादायक आहेत. बलात्कार आणि शोषण या संबंधीच्या अनेक गोष्टींना या अहवालाने वाचा फोडली आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर अभिनेता सिद्दिक्की यांनी असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट या संघटनेचा राजीनामा दिला आहे.

मनिषाने नेमकं काय काय सांगितलं?

मनिषा ही कोलम जिल्ह्यातल्या एका छोटे खेडेगावात राहणारी मुलगी. तिला सर्वात आधी २०१४ मध्ये शोषणाचा सामना करावा लागला. सुरुवातीला ती हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करत होती. त्यावेळी एका वरिष्ठ मेक-अपमनने तिला त्याच्या खोलीत बोलवलं. त्यावेळी तिचा लैंगिक छळ करण्यात आला. तसंच तिने दुसरा एक अनुभव सांगितला की रात्रीचे ११.३० वाजले होते. ज्या ठिकाणी चित्रीकरण चाललं होतं ती जागा कमी लोक वस्तीची होती. तिथून परतण्यासाठी वाहन नव्हतं. तेव्हा मला रडू कोसळलं, त्यावेळी मला प्रॉडक्शनच्या एका माणसाने त्याच्या गाडीने घरी सोडलं. कुठल्याही वेळी काम करावं लागणं, आदर न मिळणं, सोयी नसणं या गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत असं तिने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

Kerala film industry News
हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर केरळमध्ये आंदोलन करण्यात आलं. (फोटो-इंडियन एक्सप्रेस)

सेक्सची मागणी तर सर्रास केली जाते

यानंतर मनिषा म्हणाली एकदा मी एका मेक अप आर्टिस्टला फोन कॉल केला. तो कॉल मी ठरवून रेकॉर्ड केला. त्यावेळी मी त्याला विचारलं की तू मला काम देतो आहेस, तुला याबदल्यात काय हवं आहे? त्यावर त्याने सेक्स असं उत्तर दिलं असा आरोप मनिषाने केला. यानंतर मी FEFKA म्हणजेच केरळच्या सिनेमाशी ( Kerala Film Industry ) संबंधित असोसिएशनशी संपर्क केला आणि लैंगिक छळाचे मुद्दे मांडले. पण माझ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यानंतर घडलं असं की काम मिळवण्यासाठी माझा संघर्ष वाढला. सहजासहजी कुणी काम मिळू दिलं नाही.

FEFKA ने नेमकं काय सांगितलं?

मनिषाने दिलेल्या माहितीनंतर इंडियन एक्स्प्रेसने फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ केरळ म्हणजेच FEFKA कडे ( Kerala Film Industry ) संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणात कानावार हात ठेवले. आमच्याकडे अशी कुठलीही तक्रार आली नाही असं त्यांनी सांगितलं. तसंच कुठलीही तक्रार आली तर आम्ही ती अनुत्तरित ठेवत नाही असंही उत्तर दिलं. FEFKA या फेडरेशनशी २१ संघटना संलग्न आहेत. तसंच ६३ सदस्य त्यांच्या जनरल कौन्सिलमध्ये ( Kerala Film Industry ) आहेत. या संस्थेचे सचिव बी. उन्नीकृष्णन यांनी असंही सांगितलं की अनेक तक्रारी अंतर्गतच सोडवल्या जातात. मी खरंतर या संस्थेशी संबंधित युनियनचा भाग होते. पण मला मागच्या १४ वर्षांपासून ओळखपत्रही देण्यात आलं नव्हतं मला ते यावर्षी मे महिन्यात मिळलं असं मनिषाने सांगितलं. मला वाटत नाही की मी फार काळ या सिनेसृष्टीत राहिन असंही मनिषा म्हणाली.

नाव न सांगण्याच्या अटीवर दुसऱ्या मेक अप आर्टिस्टने काय सांगितलं?

मनिषा प्रमाणे आणखी एक मेक अप आर्टिस्ट आहे तिने नाव न सांगण्याच्या अटीवर तिच्या शोषणाची माहिती दिली. तिने सांगितलं की, “मी १९९० च्या दशकात मल्ल्याळम सिनेसृष्टीत ( Kerala Film Industry ) आले. त्या काळात वेळेचं काही भानच नसे, तसंच शिफ्टही लांबत, काम करणं खूप कठीण आणि आव्हान्हात्मक होतं. पुरुष सहकारी शोषण करायचे. मला आलेले ते अनुभव आठवले तरीही अंगावर काटा येतो. मी सध्याच्या घडीला क्वचित कधीतरी काम करते.” तिने एक विसरता येणार नाही असा अनुभवही सांगितला, मेक अप आर्टिस्ट म्हणाली, “आम्ही शुटिंगसाठी एके ठिकाणी गेलो होतो. तिथे हॉटेलवर थांबलो. मी सकाळी उठले तेव्हा मला धक्का बसला कारण माझ्या बेडवर शेजारी एक माणूस काळी लुंगी घालून बसला होता. मी त्याला पाहून पळाले. तर मला इतरांनी सांगितलं तुला भास झाला असेल. पण मी त्या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल केली. मी ज्या काळात काम करत होते तेव्हा तर मेक-अप आर्टिस्ट दार वाजवायचे रुममध्ये येण्याआधीच सेक्सची मागणी करायचे. माझ्याबरोबर हा प्रकार दोनदा झाला आहे. पण मी ते दार वाजवत असताना उघडलं नाही. एकदा मी पीपहोलमधून पाहिलं तर आमच्या चित्रपटाचे ( Kerala Film Industry ) निर्मातेच उभे होते. हे पाहून मला धक्का बसला.” असं या मेक अप आर्टिस्टने सांगितलं.

हे पण वाचा- मॉलीवूड लैंगिक शोषण प्रकरण: अभिनेते मोहनलाल यांचं मोठं विधान; “अनेक लोक यात..”

मेक अप आर्टिस्टने काय सांगितलं?

या मेक-अप आर्टिस्टप्रमाणे आणखी एका मुलीने सांगितलं की २०२३ पासून माझ्याकडे कुठलंही काम नाही. पण भयंकर अनुभव मी देखील घेतले आहेत. “मी एकदा रुममध्ये बसून हेअर स्टाईल डिझाईन करत होते. तेवढ्यात एक वरिष्ठ मेक अप मन आला, त्याने येताना दरवाजाची कडी लावली. त्यानंतर माझ्याशी चुकीच्या पद्धतीने बोलू लागला. मी त्याला आत्ताच्या आता बाहेर जा सांगितलं तेव्हा त्याने मला त्याच्या जवळ ओढलं. मी कशीबशी सुटले आणि तिथून पळाले.”

सहाय्यक महिला दिग्दर्शकाने काय सांगितलं?

फक्त मेक अप आर्टिस्टच नाही तर एका महिला सहाय्यक दिग्दर्शकानेही सांगितलं की मल्याळम सिनेसृष्टीत ( Kerala Film Industry ) सेक्सबाबत विचारणा केली जाणं नॉर्मल आहे. ती म्हणाली जेव्हा तुम्ही सहाय्यक म्हणून काम करत असता तेव्हा तुम्ही दिग्दर्शक बनण्याचंही स्वप्न पाहता. पण सेक्सबाबत विचारणा झाली किंवा तत्सम फेवर करण्याचे प्रश्न विचारले गेले की ही स्वप्नं मातीमोल होतात. हे असे सगळे अनुभव हेमा समितीच्या अहवालातून बाहेर आले आहेत जे धक्कादायक आणि तेवढेच चिड आणणारे आहेत.

(मनिषाने तिच्या नावाचा उल्लेख करावा अशी संमती दिली आहे.)