या कठीण काळातसुद्धा प्रेक्षकांना भरभरून मनोरंजन देण्याचा विडा झी टॉकीजने उचलला आहे. प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करण्यासाठी झी टॉकीज घेऊन येत आहे एक विशेष चित्रपट ‘केसरी’. येत्या रविवारी दुपारी १२ आणि आणि संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात कुस्ती खेळली जाते. तेथील घरात एक तरी गडी हा पैलवान असतो आणि एकदा तरी ‘महाराष्ट्र केसरी’ जिंकण्याचे स्वप्न पैलवान उराशी बाळगून असतो. कुस्तीच्या या खेळाची आणि ते खेळणाऱ्या कुस्तीवीरांची कथा आणि व्यथा मांडणारा हा चित्रपट आहे. आखाड्यात उतरून भल्याभल्यांना कुस्तीत चीतपट करण्याचे स्वप्न या चित्रपटातील नायक म्हणजेच बलराम जाधव पाहतो आहे.

बलरामचे वडील गवळी, घरची परिस्थिती अगदी बेताची. तरीपण बलराम आजोबांच्या मदतीने पैलवान होण्यासाठी धडपड करतो आहे. मात्र बलरामच्या वडिलांना हे मान्य नाही. अखेर एका क्षणी पैलवान होण्याचे स्वप्न मनाशी घेऊन बलरामला घर सोडावे लागते आणि इथून पुढे त्याचा शोध सुरु होतो. आखाड्यात उतरण्यासाठी लागणारा खुराक कुठून आणायचा इथपासून ते तालिम देणारा गुरू कोण? असे अनेक प्रश्न समोर असलेला बलराम ‘महाराष्ट्र केसरी’ बनणार का? त्याचा प्रवास किती खडतर असणार? हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला केसरी चित्रपट पहावा लागेल.

Story img Loader