अभिनेत्री केतकी चितळे ही सातत्याने विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या वक्तव्यांमुळे ती अनेकदा अडचणीत येताना दिसते. गेल्यावर्षी केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. यामुळे तिला तुरुंगवास भोगावा लागला होता. आता केतकी चितळेने तिच्या हातावर याबद्दलचा एक टॅटू गोंदवून घेतला आहे. त्यामुळे तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केतकी चितळेने नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केलं. याचा एक व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत ती “माफ करा पण कधीही विसरू नका… हॅप्पी न्यू इयर” असं म्हणत दारु पिताना दिसत आहे. या व्हिडीओत केतकी चितळेने हातावर एक टॅटू काढल्याचे दिसत आहे. यात ‘186/22’ असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये असंही लिहिलं की, “मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है।”
आणखी वाचा : “उर्फी जावेद रुपी स्त्री देहाचा बाजार रोखा” चित्रा वाघ यांचे मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र, म्हणाल्या “चार भिंतीच्या आड…”

यानंतर आता तिने तिच्या या टॅटूचा नेमका अर्थ काय? याबद्दल सांगितले आहे. तिने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर एका नेटकऱ्याने तिला या टॅटूचा अर्थ विचारला आहे. तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या या हातावरच्या टॅटूचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. त्यावर तिने याचा अर्थ सांगितला आहे.

“हा टॅटू म्हणजे माझा अंडरट्रायल कैदी नंबर आहे. ते अंक कैदी नंबरचे आहेत. मी कोणालाही माफ करु शकते. पण विसरु शकत नाही”, असे तिने त्या नेटकऱ्याला उत्तर देताना म्हटले आहे.

आणखी वाचा : “भारत देश हा प्रत्येक सेकंदाला बदलतोय अन्…” केतकी चितळेने अमृता फडणवीसांना लगावला टोला

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी चितळे ४१ दिवस तुरुंगात होती. तिची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या विरोधात अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक झाल्यानंतरही ती तिच्या भूमिकेवर ठाम होती. तिने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिलेल्या मुलाखतींमध्येही तिच्यासह घडलेला प्रकार बेयादेशीर होता असे म्हटले आहे. तरी अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर केतकीने ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ketaki chitale hand tattoo meaning direct connection to sharad pawar nrp