‘शाळा’ या प्रसिद्ध चित्रपटातील ‘सुऱ्या’ अर्थात केतन पवार आता लवकरच ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

शिवम क्रिएशन्सच्या युवराज पवार निर्मित आणि राजेंद्र पवार दिग्दर्शित या चित्रपटात दूरचित्रवाहिन्यांचे अतिक्रमण आणि इंटरनेटच्या महाजालात गुरफटलेल्या पौगंडावस्थेतील एका मुलाच्या भावभावनांचे चित्रण करण्यात आले आहे. या पौगंडावस्थेतील मुलाची भूमिका केतन पवारने केली आहे.
या चित्रपटात अरुण नलावडे, डॉ. विलास उजवणे, संजीवनी जाधव, प्रीतम भुजबळराव, प्राजक्ता यादव आणि अन्य कलाकार आहेत.
पौगंडावस्थेतील मुलांचे योग्य आणि अयोग्य काय याचे भान सुटलेले असते. यातून मुलांना बाहेर काढणे आणि ते करताना यातून कोणतीही गंभीर समस्या उद्भवणार नाही, याचीही काळजी पालक आणि कुटुंबातील सगळ्यांना घ्यावी लागते. पालकांची जबाबदारी नेमकी काय, ते यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Story img Loader