कन्नड सुपरस्टार यशचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ २’ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे. हा चित्रपट एका मागोमाग एक नवे रेकॉर्ड बनवताना दिसत आहे. एवढंच नाही तर या चित्रपटातील यशचे डायलॉग सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. खासकरून त्याची व्यक्तिरेखा रॉकी भाईचा ‘वायलेन्स वायलेन्स’ हा डायलॉग खूपच लोकप्रिय झाला आहे.
यशच्या या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन सध्या बरंच गाजतंय. यासाठी यशच्या व्यक्तिरेखेला मराठमोळा वॉइसओव्हर आर्टिस्ट सचिन गोळेनं आवाज दिला आहे. सचिन मागच्या १७ वर्षांपासून डबिंगचं काम करत आहे. त्यानं याआधीही बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांसाठी आवाज दिला आहे. नुकत्याच ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सचिननं ‘केजीएफ २’ बाबत बरेच रंजक खुलासे केले आहेत. सचिननं केजीएफच्या पहिल्या भागासाठीही डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं आणि त्याची निवड स्वतः यशनं केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा