दिग्दर्शक प्रशांत नील यांचा ‘केजीएफ चॅप्टर २’ प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. रॉकी भाईच्या दमदार अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेता यशच्या अभिनयाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. केजीएफ २ हा तेलुगू चित्रपट असून त्याला हिंदीमध्ये डब करण्यात आलं आहे. मात्र आता चाहते त्याला हिंदी चित्रपटांमध्येही पाहण्यास उत्सुक आहेत. यशला अनेक मुलाखतींमध्ये बॉलिवूड डेब्यूबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. पण एका मुलाखतीत त्यानं प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

केजीएफ प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता यशनं एक मुलाखत दिली होती. ज्यात एका रॅपिड फायर राउंडमध्ये त्यानं एका प्रश्नाचं उत्तर देताना बॉलिवूड अभिनेत्रीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या राउंडमध्ये यशला, ‘कोणत्या अभिनेत्रीसोबत बॉलिवूड पदार्पण करण्याची इच्छा आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेता यशनं अभिनेत्री दीपिका पदुकोणचं नाव घेतलं होतं आणि यासोबतच त्यानं यामागचं कारणही सांगितलं होतं.

दीपिका पदुकोण बेंगळुरूची असल्यानं मला तिच्यासोबत काम करायचं आहे असं यावेळी यश म्हणाला होता.

दरम्यान ‘केजीएफ चॅप्टर २’ काही दिवसांपूर्वी म्हणजेच १४ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनं अधीरा ही खलनायकी भूमिका साकारली आहे. याशिवाय अभिनेत्री रवीना टंडनचीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Story img Loader