‘बाहुबली’नंतर सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेला दाक्षिणात्य सिनेमा म्हणजे ‘केजीएफ चॅप्टर १’ या चित्रपटाचा दुसरा भाग ‘केजीएफ चॅप्टर २’ काही महिन्यांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवले. कन्नड, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला होता. ‘केजीएफ चॅप्टर २’ ने एकूण १००० कोटींची कमाई केली. पुढच्या काही वर्षात ‘केजीएफ’चा तिसरा भाग येणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘केजीएफ’ १ आणि २ या दोन्ही चित्रपटांमुळे कन्नड सुपरस्टार यशला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. या चित्रपटांच्या कथेमध्ये मध्यवर्ती असलेल्या रॉकी या पात्रामुळे यशला नवी ओळख मिळाली. रॉकीसह गरुडा, अधीरा अशा एकापेक्षा एक व्यक्तिरेखा लोकांच्या लक्षात राहिल्या. ‘केजीएफ’मधील असेच एक महत्त्वाचे पात्र म्हणजे खासिम चाचा. मुंबईत रॉकीसोबत असणाऱ्या खासिम चाचांची भूमिका अभिनेते हरीश राय यांनी साकारली आहे. नुकतंच त्यांनी स्वत:बद्दल खळबळजनक विधान केले आहे.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”

आणखी वाचा-“आधी बॉलिवूड करिअर सांभाळ…” ‘लायगर’मधील ‘त्या’ डायलॉगमुळे अनन्या पांडे ट्रोल

एका मुलाखतीमध्ये बोलताना हरीश राय यांनी त्यांना कर्करोग झाल्याचे सांगितलं आहे. मुलाखती दरम्यान ते म्हणाले की, ‘काही प्रसंग तुम्हाला महान बनवतात, तर काहींमुळे तुम्ही मागे पडता. यातून मी बाहेर पडेन असं वाटत नाही. तीन वर्षांपासून मी कॅन्सरचा सामना करत आहे. याच कारणामुळे मी ‘केजीएफ’मध्ये माझी दाढी वाढवली होती. या आजारामुळे माझ्या मानेला सूज आली होती. ती लपवण्यासाठी मी दाढी वाढवायचे ठरवले. या आजारांच्या उपचारासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणून मी ऑपरेशन करणे टाळत होतो. मी चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत होतो. कॅन्सर चौथ्या स्टेजला पोहचला आहे. आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे.’

आणखी वाचा- Photos : ‘KGF’ स्टार यशचं पत्नी राधिकासोबत रोमॅंटिक व्हॅकेशन; फोटो सोशल मीडियावर चर्चेत

हरीश यांनी नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमार्फत ते त्यांच्या चाहत्यांकडे आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडे मदत मागितली होती. हरीश राय यांना कॅन्सरच्या उपचारांसाठी दरमहा ३ लाख रुपये खर्च करावे लागतात. यामध्ये त्यांच्याकडचे सर्व पैसे खर्च झाले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘तुम्हाला कॅन्सर असल्याचे तुम्ही याआधी कोणाला का सांगितले नाही ?’ असा प्रश्न हरीश यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ‘चित्रपट पूर्ण करण्याच्या नादात मला झालेला आजार दिवसेंदिवस वाढत गेला. मी आजारी आहे असं सांगितलं असतं, तर मला काम मिळालं नसतं.’ असे उत्तर दिले. प्रशांत नील यांच्या केजीएफ १ आणि २ या चित्रपटांमध्ये काम केलेल्या हरीश राय यांनी ‘धन धना धन’, ‘जोडी हक्की’, ‘तयव्वा’, ‘संजू वेड्स गीता’ असे सुपरहिट चित्रपट देखील केले आहेत.

Story img Loader