‘पुष्पा’, ‘कांतारा’, ‘केजीएफ’ या चित्रपटांनी मागच्यावर्षी बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. ‘केजीएफ’ फेम अभिनेता यश याला या चित्रपटामुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. या चित्रपटातील ‘रॉकी भाई’ या त्याच्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. आज यशचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त केजीएफच्या निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

‘केजीएफ’ चित्रपटाचा पहिला भाग २०१८ साली प्रदर्शित झाला होता तर दुसरा भाग मागच्या वर्षी प्रदर्शित झाला. निर्मात्यांनी तिसऱ्या भागाची हिंट दिली आहे. मात्र चाहत्यांना हा या चित्रपटाची पाहावी लागणार आहे. कारण या चित्रपटाचे चित्रीकरण २०२५ साली सुरु करण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या कथेवर काम सुरु आहे. चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या होम्बाळे प्रॉडक्शनने ट्वीट करत माहिती दिली.

Paaru
Video :”तुझा जर होकार असेल…”, वाढदिवशी अहिल्यादेवी आदित्यला देणार खास सरप्राइज; दुसरीकडे ‘पारू’ला कोसळणार रडू…; पाहा प्रोमो
sukanya mone daughter julia completed masters degree
सुकन्या मोनेंच्या लेकीने ऑस्ट्रेलियात मिळवली मास्टर्स पदवी; नोकरी…
ashwini mahangade
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कोणता सीन होता सर्वात कठीण? अश्विनी महांगडे म्हणाली…
ashwini dhir son jalaj dhir died in accident
प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचं वयाच्या १८ व्या वर्षी अपघाती निधन; मित्राला झाली अटक
Kishor Mhabole
सेटवर कोणाशी खास बॉण्ड तयार झाला आहे? ‘आई कुठे काय करते’मधील अप्पा म्हणाले, “माझा स्पेशल बॉण्ड…”
Aishwarya Narkar Fitness Secret
ऐश्वर्या नारकर यांच्या सौंदर्याचं आणि फिटनेसचं रहस्य काय? व्हिडीओ शेअर करत स्वत: दिली माहिती
Tula Shikvin Changalach Dhada New Promo
लग्न मोडणार! ‘चारुलताचं सोंग घेतलं’ म्हणत भुवनेश्वरीने रडून मागितली जाहीर माफी, चारुहास संतापला अन् अधिपती…; पाहा प्रोमो
shoojit sircar irrfan khan I want to talk movie
इरफान खानच्या निधनाचं दु:ख आजही कायम, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितले अभिनेत्याचे शेवटचे क्षण; म्हणाला, “तो मानसिकरित्या…”

‘केजीएफ’ हा मूळ कन्नड चित्रपट असून तो कोळसा माफियांवर आधारित चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत निल यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती होम्बाळे प्रॉडक्शनने केली होती. या चित्रपटामुळे अभिनेता यश प्रसिद्धीच्या झोतात आला, विशेष म्हणजे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात रविना टंडन, संजय दत्तसारखे बॉलिवूड कलाकार होते. प्रेक्षकांना आता तिसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे.