दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा ‘सालार’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आदिपुरुष’ फ्लॉप झाल्यानंतर प्रभासच्या आगामी चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. हा चित्रपट शाहरुख खानच्या ‘डंकी’बरोबर एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आह. दोन्हीच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर या दोन्ही आघाडीच्या अभिनेत्यांच्या चित्रपटाच्या क्लॅशची जोरदार चर्चा आहे. अशातच प्रभासच्या ‘सालार’बद्दल एक नवी अपडेट समोर आली आहे.

‘सालार’ हा प्रशांत नील युनिव्हर्समधला चित्रपट आहे अन् यामध्येही आधीच्या चित्रपटांचे काही संदर्भ पाहायला मिळणार आहेत. यामुळेच आता ‘सालार’मध्ये रॉकी भाई म्हणजेच यश दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकूणच चित्रपटातील कॅमिओचे महत्त्व पाहता प्रशांत नील यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “कधी कधी काही घटना घडतात, पण…”; मुंबईत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sanjay Raut On Dhananjay Munde and PM Modi Mumbai Visit
Dhananjay Munde : “…मग धनंजय मुंडेंवर अन्याय का?”, PM मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याच्या मुद्यावर राऊतांचा थेट सवाल
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा
Baahubali Beed Murder in Beed News
बाहुबलींचे बीड: अराजकाचे वर्तुळ!

आणखी वाचा : नाना पाटेकरांनी भर गर्दीत चाहत्याला मारलं; व्हिडीओ व्हायरल झाल्यावर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी दिलं स्पष्टीकरण

‘ट्रॅक टॉलीवुड’च्या रीपोर्टनुसार ‘सालार’च्या क्लायमॅक्समध्ये सुपरस्टार यशची झलक पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं कलेक्शन वाढवण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. ‘सालार’चा टीझर जेव्हा समोर आला तेव्हा तो प्रेक्षकांना ‘केजीएएफ’सारखाच भासला होता. अद्याप या कॅमिओबद्दल कोणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत आहेत.

याबरोबरच मीडिया रीपोर्टनुसार ‘सालार’मध्ये ऐनवेळी बरेच बदल करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. ‘सालार’मध्ये प्रभासबरोबर श्रुती हासन, जगपती बाबू. पृथ्वीराज सुकुमारन आणि टिनू आनंद सारखे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय यशच्या कॅमिओने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. ‘सालार’चे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader