Khamoshi Sunn New Hindi Song : विविध प्रकारच्या चित्रिकरणात अनेक अडचणी येत असतात. या अडचणींवर मात करून हे चित्रिकरण पार पाडलं जातं. ऐन वेळेला चित्रिकरण थांबवलं किंवा रखडलं तर कलाकार आणि निर्मात्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. परंतु, हे नुकसान होऊ नये आणि संगीत प्रेक्षकांना एक उत्तम गाणं लवकरात लवकर ऐकायला मिळावं याकरता वादळी वारा, पूर आणि पावसाची तमा न बाळगता खामोशी सून हे गाणं शूट करण्यात आलं आहे. झी म्युझिकने हे गाणं नुकतंच प्रदर्शित केलंय. हे गाणं शूट करताना कोणती आव्हाने आलीत, याबाबत या सिंगल अल्बमचे दिग्दर्शक विनय कोरे यांनी लोकसत्ताशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खामोशी सून असे बोल असलेलं एक नवं कोरं गाणं झी म्युझिकनं नुकतंच प्रदर्शित केलं आहे. एका गोड ब्रेकअपची कहाणी या गाण्यातून मांडण्यात आली आहे. ब्रेकअप्स कितीही दुःखदायक असले तरीही त्याच्यामागे असंख्य गोड आठवणी दडलेल्या असतात. याच गोड आठवणींची गोष्ट या गाण्यात सांगण्यात आली आहे.

हेही वाचा >> अभिषेक बच्चन बॉलीवूडमधून घेणार होता कायमची निवृत्ती; बिग बींच्या ‘त्या’ सल्ल्यामुळे बदलला निर्णय; म्हणाला…

कलाकार आणि तंत्रज्ज्ञांची साथ

या गाण्याविषयी माहिती देताना दिग्दर्शक विनय कोरे म्हणाले, हे गाणं आम्ही लोणावळा येथे शूट केलं. लोणावळ्यात चित्रिकरणाकरता पोहोचताच तिथं तुफान पावसाने आमचं स्वागत केलं. वादळी वारा आणि पूर आला होता. एवढ्या पावसात शूट कसं करायचं हा प्रश्न होता. चित्रिकरण पुढे ढकलायचं तर मोठं नुकसान सहन करावं लागणार होतं. पण सुदैवाने आमचे सर्वच कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी साथ दिली. त्यांनी या भरपावसातही शूट करण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार आम्ही चित्रिकरणाला सुरुवात केली.

या गाण्याचे बोल शोएब अहमद यांनी लिहिले असून त्यांनी गायले आहे. तसंच, सौरव गिरी यांनी त्यांना गाण्ं कम्पोज करायला मदत केली आहे. सुदर्शन गाढवे आणि आंचल धिमान हे या गाण्यात कलाकार असून त्यांनी अत्यंत सुंदरपणे गाण्याचा मतितार्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. विनय कोरे फिल्म्स या निर्मिते संस्थेअंतर्गत हे गाणं चित्रित झालं असून विनय कोरे हेच निर्माते आणि दिग्दर्शक आहे. रोमित सोनी यांनी हे गाणं एडिट केलं असून शोएब मसुरी हे या गाण्याचे डीओपी आहेत.