मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्याच्या घडीला चित्रपटांसोबतच नवनव्या अल्बमचीदेखील निर्मिती होताना दिसत आहे. त्यामुळे या अल्बमच्या रांगांमध्ये आता आणखी एका नव्या गाण्याची भर पडली आहे. गीतकार, गायक वैभव लोंढे यांचं ‘खंडेराया झाली माझी दैनी’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुती असलेल्या या गाण्याला वैभव यांचा आवाज लाभला असून त्याची निर्मिती चेतन गरुड प्रोडक्शनअंतर्गत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गाण्याला साजेसा असा माहोलही तयार करण्यात आला आहे.

दरम्यान, एका ट्रेडिशनल गाण्याला रोमॅण्टीक टच देण्याचा प्रयत्न संगीत दिग्दर्शकांनी केला आहे. वैभव लोंढे यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून संगीतदिग्दर्शनही केले आहे.

साईशा पाठक व वैभव लोंढे यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याचे दिग्दर्शन तेजस पाटील यांनी केले आहे. रवी उछे यांनी गाण्याचे छायाचित्रण केले आहे तर रोहन माने यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. वेगळ्या बाजातील ‘खंडेराया झाली माझी दैना’ हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khanderaya zali mazi daina song vaibhav londhe treats the audience to a romantic chartbuster
Show comments