अरबाझ, सोहेल आणि सलमान या खान भावंडांची सुंदर मुलांना जन्म देण्याची खासियत असल्याचे अभिनेत्री मलायका अरोरा खानचे म्हणणे आहे. खान भावंडांच्या वेगळेपणाबाबत विचारले असता, मलायका म्हणाली, त्यांच्यात सुंदर मुलांना जन्म देण्याची खासियत आहे. फक्त सलमान वगळता… जेव्हा केव्हा तो लग्न करेल… त्याची होणारी मुलेही निश्चितच सुंदर असतील.
४० वर्षांची मलायका अभिनेता-निर्माता अरबाझची पत्नी असून, त्यांना अरहान नावाचा मुलगा आहे. सोहेलचे सीमा सचदेवशी १९९८ मध्ये लग्न झाले असून, त्यांना निर्वाण आणि योहान नावाची दोन मुले आहेत. सलमानचे अद्याप लग्न झालेले नाही.
मलायका अरोरा खान ‘इंडियाज गॉट टेलेन्ट’ शोची परीक्षक असून, या वर्षीच्या शोमध्ये अदभूत टॅलेन्ट असल्याचे तिचे म्हणणे आहे. या शोमध्ये वय वर्ष तीनपासून ते ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तींचे टॅलेन्ट पाहाता येणार आहे. या विषयी बोलताना मलायका म्हणाली, शो मधील अदभूत आणि अविश्वसनीय वाटाव्यात, अशा करामती बघून मी दंग झाले. या करामती करण्यासाठी हिम्मत आणि दृढ संकल्पाने मला आकर्षित केले.
मलायकाशिवाय या शोमध्ये करण जोहर आणि किरण रावदेखील परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. या शोची सुरूवात कलर्स वाहिनीवर ११ जानेवारीला होत असून, प्रत्येक शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता हा शो पाहता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2014 रोजी प्रकाशित
सुंदर मुलांना जन्म देणे ही खान भावंडांची खासियत – मलायका
अरबाझ, सोहेल आणि सलमान या खान भावंडांची सुंदर मुलांना जन्म देण्याची खासियत असल्याचे अभिनेत्री मलायका अरोरा खानचे म्हणणे आहे. खान भावंडांच्या वेगळेपणाबाबत विचारले असता...

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-01-2014 at 08:14 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khans have the talent of producing handsome kids malaika arora