नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘खरं खरं सांग’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या नाटकात अभिनेता राहुल मेहेंदळे आणि सुलेखा तळवलकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतात. पण आता पुढील काही दौऱ्यांसाठी हे दोन्हीही कलाकार यात दिसणार नाही. यामागचे कारणही समोर आले आहे.
अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले यांनी नुकतंच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांनी ‘खरं खरं सांग’ या नाटकाबद्दल सांगितले आहे. येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये या नाटकाचा दौरा युएसए आणि कॅनडा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या नाटकात मुग्धा गोडबोले या प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.
आणखी वाचा : “आदल्या दिवशीचा चिकनचा रस्सा, शिळी भाकरी अन्…” दुबईत फिरणाऱ्या मराठी अभिनेत्याला येतेय मराठमोळ्या खाद्यपदार्थांची आठवण, म्हणाला…
आनंद इंगळे यांची पोस्ट
“मित्रांनो.. आमचा “खरं खरं सांग” या नाटकाचा USA & Canada दौरा october- november मध्ये आहे. आमच्या नाटकातील दोन महत्वाचे कलाकार सुलेखा तळवलकर आणि राहुल मेहेंदळे त्याच्या इथे चालू असलेल्या मालिकेमधील व्यग्रतेमुळे हा दौरा करू शकणार नव्हते.
काय करायचं हा प्रश्न होताच.. दौरा रद्द करुया इथपर्यंत विचार झाला होता.. पण इथल्या आणि तिथल्या निर्मात्यांचे, बाकी कलाकारांचे नुकसान होऊ नये म्हणून अतुल परचुरे आणि मुग्धा गोडबोले हे दोन कलाकार मित्र आमच्या विनंतीला मान देऊन , मदतीला आले.. खरं तर या दोघांची कलाकार म्हणून असलेली ताकद, आणि या व्यवसायातील स्थान खूपच मोठे आहे.. याची नम्र जाणीव आम्हा बाकीच्या कलाकारांना, दिग्दर्शक निर्मात्यांना आहेच..
अतुल – मुग्धा तुमचे मनापासून आभार आणि welcome to खरं खरं सांग…, सुलेखा आणि राहुल तुम्हाला पण मनापासून धन्यवाद.. will definitely miss you both.. या दौऱ्याहून परत आल्यावर तितक्याच जोमाने आणि धमाल करत पुढचे प्रयोग करुया..
त्यातून महत्वाची गोष्ट म्हणजे परदेशी प्रयोग करण्याआधी इथे 4 प्रयोग आम्ही या नवीन संचात करणार आहोत..
7 ऑक्टोबर दुपार 4 वाजता वाशी
8 ऑक्टोबर दुपार 4 वाजता दीनानाथ पार्ले
14 ऑक्टोबर दुपार 4 वाजता यशवंत नाट्यगृह माटुंगा
15 ऑक्टोबर दुपार 4 वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे</p>
जरूर जरूर पाहायला या… खळखळून हसायला या..” असे त्यांनी यात म्हटले आहे.
आणखी वाचा : “…मग घर कसं होईल?” कुटुंबियांबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर सई ताम्हणकरच्या उत्तराने वेधलं लक्ष
दरम्यान खरं खरं सांग हे नाटक चांगलेच चर्चेत आहे. हे नाटक फ्रेंच नाटककार फ्लॉरियन झेलरच्या गाजलेल्या ‘द ट्रूथ’ या नाटकावर आधारित आहे. येत्या ७ ऑक्टोबरला या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे.