छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. श्वेता सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी श्वेताला ट्रोल केले आहे.
श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ श्वेताने केपटाउनमधून शेअर केला आहे. सध्या श्वेता केपटाउमध्ये ‘खतरो के खिलाडी ११’ या रिअॅलिटी शोच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या व्हिडीओत श्वेता आणि तिचा को- कंटेस्टंट विशाल आदित्य सिंग डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत “आम्ही आनंदी असलो की असा डान्स करतो, पण प्रश्न हा आहे की आम्ही डान्स का करत आहोत, तुम्हाला काय वाटतं?”, अशा आशयाचे कॅप्शन श्वेताने दिले आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘निर्मात्याने मला हॉटेल रूममध्ये…’, नीना गुप्ता यांनी सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव
हा व्हिडीओ शेअर करत श्वेताने नेटकऱ्यांना कारण विचारले आहे. त्याला उत्तर देत काही नेटकरी म्हणाले की, ‘खतरों के खिलाडी ११’च्या फायनलमध्ये पोहोचली असणार. तर, काही नेटकऱ्यांनी श्वेताला ट्रोल केले आहे. त्यांनी श्वेताच्या वैयक्तिक आयुष्याला मध्ये आणले. एक नेटकरी म्हणाला, ‘तू तिसरं लग्न करणार आहेस?’ दुसरा वापरकर्ता म्हणाला, ‘होय आणि आणखी एक कोंबडा भेटला आहे.’
आणखी वाचा : सलमान आधी ऐश्वर्यावर संजय दत्त झाला होता फिदा, पण या व्यक्तीने दिली होती ताकीद
दरम्यान, श्वेताने ‘खतरों खिलाडी ११’मध्ये भाग घेतला आणि ती केपटाउनला गेल्यानंतर तिचा दुसरा पती अभिनव कोहलीने बराच गोंधळ केला होता. अभिनवने दावा केला होता की श्वेताने मुलगा रेयांशला हॉटेलमध्ये सोडले आणि ती शोमध्ये भाग घेण्यासाठी गेली आहे. श्वेताने मुलाला भेटण्याची परवानगीही अभिनवला दिली नव्हती. अभिनवने सोशल मीडियावर सीसीटीव्ही फुटेज आणि मेसेजही शेअर केले. दुसरीकडे, श्वेताने अभिनवचा आरोप फेटाळून लावले होते.