खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोच्या नवव्या सिझनची शूटिंग सध्या अर्जेंटिनामध्ये सुरू आहे. यामध्ये सेलिब्रिटी थरारक आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणणारे स्टंट्स करताना पाहायला मिळतात. या स्टंटदरम्यान आदित्य नारायण आणि विकास गुप्ता हे स्पर्धक दुखापतग्रस्त झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका स्टंटदरम्यान आदित्यच्या डोळ्याला इजा झाली. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला आठवडाभर आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसऱ्या एका स्टंटदरम्यान विकास गुप्ताला साप चावला. त्याला काही इंजेक्शन्स दिले असून बरा होण्यास काही दिवस लागणार असल्याचं कळतंय.

Fanney Khan Review : स्वप्नपूर्तीचा वेध घेणारा ‘फन्ने खान’ प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी

खरंतर प्रत्येक स्टंट स्पर्धकांना करण्यास सांगण्यापूर्वी शोच्या टीमकडून सुरक्षेची व्यवस्थित काळजी घेतली जाते. या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी स्वत: सुरक्षेबाबत खातरजमा करून घेत असतो. तसंच पहिल्यांदाच अशा प्रकारच्या घटना घडल्याचं शोच्या टीमकडून म्हटलं जात आहे. या घटनांमुळे रोहितनेही सेटवर राग व्यक्त केला. स्पर्धकांच्या सुरक्षेची अधिक काळजी यापुढे घेतली जाईल अशी ग्वाही टीमकडून देण्यात आली आहे.