छोट्या पडद्यावरील गाजलेला रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ अधिक अॅक्शन आणि आश्चर्यकारी घटनांसह पुनरागमन करत आहे. रोहित शेट्टी, प्रियांका चोप्रा आणि अॅक्शन हिरो अक्षय कुमारने सूत्रसंचालन केलेल्या या शोचे यावेळचे सूत्रसंचालन नव्या दमाचा अभिनेता अर्जुन कपूर करणार आहे. यावेळी स्पर्धकांना अर्जेंटिनामध्ये साहसी खेळांचा सामना करावा लागणार आहे. जय भानुशाली, सिध्दार्थ शुक्ला आणि ‘झलक दिखला जा रिलोडेड’चा विजेता फैझल खान इत्यादी सेलिब्रिटी सहभागी होऊन स्टंटवर आधारित या रिअॅलिटी शोमध्ये आपल्यातील सहन शक्तीचे आणि सामर्थ्याचे प्रदर्शन करतील.
“कभी पिडास कभी किडा” असे शीर्षक असलेल्या या शोमध्ये स्पर्धकांना भीतीवर मात करत अनेक आव्हानात्मक क्षणांना सामोरे जावे लागणार आहे. जय, सिध्दार्थ आणि फैझल व्यतिरिक्त जयची पत्नी माही विज, मिस इंडिया पार्वती ओमनकुट्टी, अभिनेत्री तनिषा मुखर्जी, सना सईद, हिमांशु मल्होत्रा, ऐश्वर्या सखुजा, टिना दत्ता, विवान भाटेना, हॉकीपटू युवराज वाल्मिकी आणि मुक्ती मोहन व राघव जुयाल हे नर्तकदेखील या शोमध्ये दिसणार आहेत.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला ‘कलर्स’ वाहिनीवर सुरु होणाऱ्या या शोद्वारे अर्जुन कपूर छोट्या पडद्यावर आगमन करत आहे.

Story img Loader