केदार शिंदे, भरत जाधव आणि सिद्धार्ध जाधव या अफलातून त्रिकुटाचा ‘खो खो’ चित्रपट आता रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरिता झी टॉकीजवर दाखविण्यात येणार आहे. नोकरीच्या निमित्ताने आपल्या वडिलोपार्जित बंद वाड्यात राहण्याचा प्रसंग भरतवर येतो आणि सुरु होतो त्याच्या पूर्वजांचा ‘खो खो’.
शोभना देसाई प्रॉडक्शन निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात विजय चव्हाण, कमलाकर सातपुते, क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी या कलाकारांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या रविवारी ९ मार्चला दुपारी १२.०० वाजता आणि सायंकाळी ६.०० वाजता पाहवयास मिळणार आहे.

Story img Loader