दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली म्हणजेच खुशी कपूर आणि जान्हवी कपूर या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत असतात. जान्हवीनंतर आता खुशीही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. झोया अख्तरच्या ‘द आर्चिस’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेतीला येणार आहे. अनेकदा खुशीच्या अफेअरबद्दल काही ना काही बोललं जात असतं. आताही असंच घडलं आहे. पण यावेळी खुशीने शेअर केलेल्या फोटोंमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हेही वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमागे ‘भाजपा’? विवेक अग्निहोत्रींनी केला खुलासा
सध्या खुशी कपूर अक्षत राजनला डेट करतेय अशा चर्चा रंगल्या आहेत. अक्षत रंजन हा जान्हवी कपूरचा एक्स बाॅयफ्रेंड आहे. जान्हवी आणि अक्षत काही काळ एकमेकांबरोबर डेट करत होते. आता खुशीनं अक्षतबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. इतकंच नव्हे तर त्या फोटोवारील त्यांच्या कमेंट्सही व्हायरल झाल्या आहेत.
खुशीनं इन्स्टाग्रामवर कॅलिफोर्नियामधले फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती क्राॅप टाॅप आणि ट्रॅक पँटमध्ये आहे. तिनं मिरर सेल्फी शेअर केलीय. नंतरचा फोटो हा अक्षतबरोबरचा आहे. या फोटोवर खुशीनं म्हटलंय, ‘चिल्ड !’ तर अक्षतने त्यावर लव्ह इमोजी दिला आहे. त्यावर खुशीनं आय लव्ह यू म्हटलं आहे.
आणखी वाचा : जान्हवी कपूरने सांगितला लग्नाचा प्लॅन, म्हणाली “माझे आई-वडील…”
खुशीच्या ‘द आर्चिस’ या पहिल्यावहिल्या चित्रपटाचीही तिचे चाहते वाट बघत आहेत. ‘द आर्चिस’ या कॉमिक्समधील पात्रांना भारतील लुक देत प्रयोगशील दिग्दर्शिक झोया अख्तरने हा सिनेमा हातात घेतला आहे. या सिनेमाचं उटीमधील चित्रीकरण पूर्ण झालं आहे. आता या सिनेमातील महत्त्वाच्या भागाचं चित्रीकरण सध्या सुरू आहे. सिनेमाच्या सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंमध्ये सुहाना, खुशी आणि अगत्स्य युनिफॉर्ममध्ये दिसत आहेत. त्यांच्याबरोबर झोया अख्तरही दिसत आहेत.