बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या ब्रेकअपच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले असल्याचंही बोललं जात आहे. मात्र या चर्चांनंतर कियारा आणि सिद्धार्थ पुन्हा एकदा एकत्र दिसले. अर्पिता खानच्या ईद पार्टीच्या वेळी कियारा आडवाणी फोटोग्राफर्सना पोज देत असताना सिद्धार्थ मल्होत्रानं एंट्री घेतली. यावेळी दोघंही एकत्र दिसले मात्र त्यावेळी या दोघांनी असं काही केलं की, दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

सोशल मीडियावर कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कियारा फोटोग्राफर्सना पोज देताना दिसत आहे. एवढ्यात सिद्धार्थ त्या ठिकाणी येतो. त्याला पाहून कियारा ‘हाय’ करते. सिद्धार्थ देखील तिला ‘हॅलो’ बोलतो. पण जेव्हा फोटोग्राफर्स दोघांनाही एकत्र पोज द्यायला सांगतात तेव्हा दोघंही त्याकडे दुर्लक्ष करत आत निघून जातात.

आणखी वाचा- देवदर्शनाला गेलेल्या तनुश्री दत्ताच्या कारचा अपघात, पायाला झाली गंभीर दुखापत

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून यावरून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. कियाराच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच अभिनेता कार्तिक आर्यनसोबत ‘भूलभुलैय्या २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याशिवाय तिच्याकडे वरुण धवन, नीतू कपूर, अनिल कपूर यांचा ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट देखील आहे. तसेच विकी कौशल आणि भूमि पेडणेकर यांच्यासोबत ती ‘गोविंदा मेरा नाम’ या चित्रपटातही दिसणार आहे.

आणखी वाचा- राणादा- पाठकबाईंची नवी इनिंग! अक्षया आणि हार्दिकनं चाहत्यांना दिला सुखद धक्का

सिद्धार्थ मल्होत्राच्या कामाबद्दल बोलायचं तर तो काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ चित्रपटात दिसला होता. जो बराच हिट ठरला होता. आगामी काळात तो रश्मिका मंदानासोबत ‘मिशन मजनू’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे करण जोहरचा ‘योद्धा’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पाटनी मुख्य भूमिकेत असणार आहे. तसेच रोहित शेट्टीची पहिली वेब सीरिज ‘इंडियन पुलिस फोर्स’मध्येही त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यात शिल्पा शेट्टी आणि विवेक ऑबेरॉय देखील दिसणार आहेत.

Story img Loader