बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी मागच्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. तिच्या आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ब्रेकअपच्या चर्चांनी त्यांच्या चाहत्यांना निराश केलं आहे. दोघंही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. लवकरच दोघंही लग्नाच्या बेडीत अडकतील अशा चर्चा असतानाच दोघंही वेगळे झाले. नुकताच कियारा आडवाणीची मुख्य भूमिका असलेल्या ‘भूलभुलैय्या २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात कियारानं एका प्रश्नाचं उत्तर देताना असं काही सांगितलं ज्याचा संबंध सिद्धार्थ मल्होत्राशी जोडला जात आहे.

ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात कियाराला एका पत्रकारानं प्रश्न विचारला होता की, ‘चित्रपटाचं नाव ‘भूलभुलैय्या’ आहेय पण तुझ्या खऱ्या आयुष्यात असं कोणी आहे का ज्याला तू विसरू इच्छितेस?’ या प्रश्नावर कियारानं जे उत्तर दिलं त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. कियारा म्हणाली, “अजिबात नाही. मी माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तींना भेटले आहे. जे माझ्या आयुष्याशी जोडले गेले आहेत. त्यातील कोणाला कधीच विसरावं असं मला वाटत नाही.”

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा- तारक मेहताच्या टीमने मागितली जाहीर माफी, लता मंगेशकर यांच्याबाबत झाली होती मोठी चूक

दरम्यान कियाराच्या या उत्तराचा संबंध सिद्धार्थ मल्होत्राशी झालेल्या ब्रेकअपसोबत जोडला जात आहे. कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात ‘शेरशाह’ चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना जवळीक वाढली. चित्रपटातील यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस तर उतरली होतीच पण खऱ्या आयुष्यातही दोघांना एकत्र पाहून त्यांचे चाहते खूप खुश होते. दोघंही मागच्या बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. पण आता अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे चाहते हैराण झाले आहेत.

आणखी वाचा- Video : टायगर श्रॉफला समोर पाहून तरुणी झाली बेशुद्ध अन्…

कियारा आडवाणीच्या कामाबद्दल बोलायचं तर लवकरच ती कार्तिक आर्यनसोबत ‘भूलभुलैय्या २’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट सुरुवातीला २०२१ मध्ये प्रदर्शित होणार होता मात्र नंतर करोनामुळे त्याचं प्रदर्शन रखडलं. आता येत्या २० मे २०२२ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कार्तिक आणि कियारा यांच्या व्यतिरिक्त संजय मिश्रा, तब्बू, राजपाल यादव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Story img Loader