‘फगली’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री कियारा अडवाणीने आपल्या अदाकारीने सर्वच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘कबीर सिंह’, ‘गुड न्यूज’, ‘एमएस धोनी’ सारख्या सुपरहिट चित्रपटांतून कियाराने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केलीय. कियाराने बॉलिवूडमध्ये एकूण सात वर्षे पूर्ण केलीयेत. गेल्या अनेक दिवसांपासून कियारा तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या रिलेशनशीपमुळे बरीच चर्चेत आलीय. त्यावर आता तिने मनमोकळेपणाने संवाद साधलाय.
एका मुलाखतीच्या दरम्यान अभिनेत्री कियाराला सिद्धार्थ मल्होत्राबद्दल विचारण्यात आल्यानंतर ती म्हणाली, “सिद्धार्थने स्वतःला एक अभिनेता म्हणून सिद्ध केलंय. तो खूप वाचन करत असतो. प्रत्येक भूमिकेसाठी तो तयारी करणं पसंत करत असतो. तो जसा आहे तशीच मी सुद्धा. याच कारणामुळे आमचे विचार एकमेकांशी खूप जुळतात. एक मैत्रिण या नात्याने मी नक्की सांगेल की फिल्म इंड्स्ट्रीत तो माझा खूप जवळचा मित्र आहे. अशा व्यक्तींसोबत राहण्यात मला उत्साह वाटतो आणि त्यांचं माझ्या आजूबाजूला असणं मला आवडतं.”
यापुढे बोलताना कियारा म्हणाली, “मला वाटतं, एक मित्र म्हणूनही तो परिपूर्ण आहे आणि नेहमी त्याच्यासोबत राहण्यात मला आनंद आहे.”
अभिनेत्री कियारा अडवाणीचा ‘शेरशाह’ चित्रपट रिलीजसाठी सज्ज झालाय. कियारा या चित्रपटात विक्रम बत्राच्या गर्लफ्रेंड डिंपल चीमाची भूमिका साकारताना दिसणार आहे. कियाराने तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत पहिल्यांदाच झळकणारेय. दोन्ही कलाकारांचे चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
अभिनेत्री कियाराच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर, कियाराकडे आगामी काळात अनेक मोठे चित्रपट आहेत. ती वरूण धवनसोबत ‘जुग जुग जिओ’ आणि कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया 2’ मध्ये दिसणार आहे. राम चरण यांच्यासोबत पॅन इंडिया फिल्म ‘आरसी 15’ची नुकतीच घोषणा करण्यात आली.